मुंबई बातम्या

मुंबई : सागरी किनारी क्षेत्रातही विकास – Sakal

मुंबई : सागरी किनारा संरक्षण क्षेत्रात (सीआरझेड) (CRZ) येणाऱ्या इमारतींना, तसेच भूखंडांना आता शहरातील इतर भागाप्रमाणे चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) (FSI) वापरता येणार आहे. यामुळे मुंबईतील (Mumbai) २० ते २५ हजार इमारती चाळींसह ६४७ हेक्टरवरील झोपड्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असून, तब्बल १० हजार ७४४ हेक्टरच्या भूखंडांना याचा फायदा होणार आहे.

याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने माहिती जारी केली किनारी क्षेत्रातील विकास कामांना गती मिळणार आहे. सीआरझेड क्षेत्रामध्ये येणाऱ्या भूखंडांचा विकास करताना आतापर्यंत केवळ एक ते दोन चटई क्षेत्र निर्देशांक वापरता येत होता; मात्र मुंबईतील इतर भागातील चटई क्षेत्र निर्देशांक वापरण्याची मर्यादा याहून कित्येक पटींनी अधिक आहे. चटई क्षेत्र निर्देशांक मर्यादित असल्याने जुन्या चाळी, इमारतींच्या पुनर्विकासाला अडचणी येत होत्या. तसेच त्याचा फटका ६४७ हेक्टरवर असलेल्या झोपड्यांनाही वसत होता. याबाबत फेरविचार करण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारला प्रस्ताव दिला होता. त्यानुसार केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या सागरी किनारा प्राधिकरणाच्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या बैठकीत सीआरझेडमध्ये येणाऱ्या भूखंडांवर शहरातील इतर भागाप्रमाणेच चटई निर्देशांक वापरण्याची परवानगी आहे. त्याबाबत आज पर्यावरण मंत्रा माहिती प्रसिद्ध केली आहे.

हेही वाचा: मुंबई : KEM रुग्णालयाच्या 29 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

केंद्रांच्या या निर्णयाचा फ मुंबईतील १० हजार ७४४ हेक्टरहून अ क्षेत्रफळावरील भूखंडांना होणार असल् अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला आहे. दक्षिण मुंबईतील १२ ते १३ चाळींना याबाबत दिलासा मिळेल. त्या बहुतांश चाळी १०० वर्षांहून अधिक ज असून त्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोक होईल. त्याचबरोबर उपनगरातील हजारहून अधिक जुन्या इमारतींनाही त्य फायदा होईल.

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-development-in-coastal-areas-also-psp05