मुंबई बातम्या

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये विविध पदांची भरती, ३२ हजार ते २ लाखांपर्यंत पगार – Maharashtra Times

हायलाइट्स:

  • मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये विविध पदांची भरती
  • ऑनलाइन माध्यमातून करा अर्ज
  • अधिकृत वेबसाइटवर मिळेल सविस्तर माहिती

Mumbai Port Trust Recruitment 2021: मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये (Mumbai Port Trust recruitment 2021) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदभरतीसाठी लागणारी शैक्षणिक आर्हता, पगार, अनुभव याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

या पदभरती अंतर्गत वरिष्ठ उपमुख्य लेखा अधिकारी, सल्लागार, साहित्य व्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य वैद्यकीय अधिकारी, आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखा, वरिष्ठ उपसचिव या रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदभरतीचा तपशील
मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत होणाऱ्या पदभरतीमध्ये वरिष्ठ उपमुख्य लेखा अधिकारी (Senior Deputy Chief Accounts Officer)

सल्लागार (Advisor)

साहित्य व्यवस्थापक (Material Manager)

वरिष्ठ उपमुख्य वैद्यकीय अधिकारी (Senior Deputy Chief Medical Officer)

आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखा (Financial Adviser & Chief Accounts)

वरिष्ठ उपसचिव (Senior Deputy Secretary)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
वरिष्ठ उपमुख्य लेखा अधिकारी, सल्लागार, साहित्य व्यवस्थापक, वरिष्ठ उपमुख्य वैद्यकीय अधिकारी,आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखा,वरिष्ठ उपसचिव या पदांसाठी संबंधित क्षेत्रातील पदवी आणि अनुभव असणे गरजेचे आहे. यासाठी पदानुसार लागणारी शैक्षणिक आर्हता आणि अनुभव यांचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

आरोग्य विभाग भरती परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर; ऑक्टोबरमध्ये होणार परीक्षा
imageVanamati Recruitment 2021: राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत भरती
पगार
वरिष्ठ उपमुख्य लेखा अधिकारी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास १ लाख ते २ लाख ६० हजार दरमहा पगार देण्यात येईल. सल्लागार पदासाठी ३२ हजार ९०० ते ५८ हजार रुपये दरमहा पगार दिला जाईल. साहित्य व्यवस्थापक पदासाठी ३२ हजार ९०० ते ५८ हजार रुपये दरमहा पगार दिला जाईल.

वरिष्ठ उपमुख्य वैद्यकीय अधिकारी पदासाठी निवड झालेल्या उमेदवारास ८० हजार ते २ लाख २० हजार दरमहा पगार दिला जाईल. आर्थिक सल्लागार आणि मुख्य लेखा या पदासाठी ८० हजार ते २ लाख २० हजार रुपये प्रतिमहिना आणि वरिष्ठ उपसचिव पदासाठी ८० हजार ते २ लाख २० हजार प्रतिमहिना पगार दिला जाणार आहे.

ऑनलाइन करा अर्ज
या पदभरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज पाठवायचा आहे. अर्ज करण्याआधी अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे आणि त्यानंतर अर्ज करावा. उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी http://onlinevacancy.shipmin.nic.in/ या लिंकवर क्लिक करावे. अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल. तसेच दिलेल्या मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

विविध पदांनुसार अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख देखील वेगळी आहे. त्यामुळे उमेदवारांनी गोंधळून न जाता इच्छित पदाची शेवटची तारीख जाणून घेऊन त्याप्रमाणे अर्ज पाठवायचा आहे.

नोटिफिकेशन पाहण्यासाठी क्लिक करा
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी क्लिक करा

imageGovernment Job 2021: भारतीय लष्कराच्या वेटरनरी कॉर्प्समध्ये भरती, जाणून घ्या तपशील
imageReliance Jio मध्ये भरती, वेबसाइटवर जाऊन करा ऑनलाइन अर्ज

Source: https://maharashtratimes.com/career/career-news/mpt-recruitment-2021-vacant-various-post-under-mumbai-port-trust-apply-online/articleshow/86575784.cms