मुंबई बातम्या

मुंबई : तीन सदस्यांचाच प्रभाग Mumbai – Sakal

मुंबई : महापालिका (Municipal) निवडणुकांसाठी (Election) प्रभाग पद्धत बदलण्यावरून काँग्रेसने उघड; तर राष्ट्रवादी काँग्रेसने (Congress) छुपी आदळआपट करूनही तीन सदस्यांची प्रभाग पद्धत कायम ठेवण्यावर मुख्यमंत्री (CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ठाम आहेत. तीन सदस्यांच्या प्रभागांचा फेरविचार करून दोन सदस्यांचा प्रभाग करण्याचा काँग्रेसच्या फेरप्रस्तावावर ठाकरे यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत ‘लाल फुली’ मारली. त्यामुळे येत्या फेब्रुवारीत होणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकांसाठी तीन सदस्यांचा प्रभाग राहणार आहे.

महापालिका निवडणुकांसाठी नगरपरिषदांमधील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे प्रस्थ मोडीत काढण्याच्या हेतूने, या निवडणुकांसाठी भाजपने ठरविलेल्या बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीलाच ठाकरे यांनीही पसंती दिल्याने दोन्ही काँग्रेसला धक्का मानला जात आहे.

हेही वाचा: लातूर: स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकवा

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील भाजपचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी प्रभाग पद्धती बदलण्याचा प्रयत्न झाला; त्यासाठी दोन्ही काँग्रेसने दोन सदस्यांच्या प्रभागाला पसंती दिली; मात्र मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील गेल्या आठवड्यातील बैठकीत मुंबई वगळता इतर शहरांसाठी तीनचा प्रभाग केला. त्यावरून लगेचच ठाकरे सरकारमध्ये वादाला सुरवात होऊन, तीनऐवजी दोन सदस्यांचा प्रभाग करण्याचा आग्रह काँग्रेसने धरला. त्यानंतर फेरप्रस्तावही ठाकरे यांना पाठवून, दोनचा प्रभाग होणार असल्याचे काँग्रेस नेते सांगत राहिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही नव्या निर्णयाचे संकेत दिले होते. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. काँग्रेसच्या प्रस्तावावर प्रचंड चर्चा झाली, त्यानंतरही ठाकरे यांनी निर्णयात कोणताही बदल केला नाही.

हेही वाचा: प्रभाग पद्धतीवरून आघाडीत धुसफुस : काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा विरोध

मुख्यमंत्र्यांची ठाकरी कार्यपद्धती

प्रभाग पद्धतीवरून ठाकरे सरकारमधील वाद चव्हाट्यावर आले, तरी ठाकरे काँग्रेसला जुमानणार नसल्याचे त्यांच्या आतापर्यंतच्या कार्यपद्धतीवरून दिसत आहे. याआधी विधानसभा अध्यक्ष निवडण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा आग्रह, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मध्यस्थी करूनही ठाकरे यांनी अध्यक्षपदाची निवडणूक टाळली होती.

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-ward-of-three-members-only-psp05