मुंबई बातम्या

आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्समध्ये होणार एकमेव मोठा बदल, जाणून घ्या कोणता… – Maharashtra Times

शारजा : मुंबई इंडियन्सचा आज सर्वात महत्वाचा सामान होणार आहे तो आरसीबीबरोबर. या महत्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघात एक महत्वाचा बदल होऊ शकतो, असे स्पष्ट संकेत शनिवारी मिळाले आहे.
मुंबई इंडियन्सच्या संघात कोणता बदल होऊ शकतो, जाणून घ्या…
गेल्या दोन्ही सामन्यांत मुंबई इंडियन्सला पराभवाचे धक्के बसले आहेत, त्यामुळेच मुंबईचा संघ हा पाचव्या स्थानावर ढकलला गेला आहे. त्यामुळे आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला विजय मिळवावा लागणार आहे. पण यासाठी मुंबईच्या संघात एकमेव मोठा बदल होणार आहे. मुंबई इंडियन्सच्या संघात या सामन्यासाठी हार्दिक पंड्याचा समावेश केला जाणार आहे. कारण हार्दिक आता पूर्णपणे फिट आहे आणि तो आरसीबीविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल,अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे आरसीबीविरुद्धच्या सामन्यात हार्दिक मुंबई इंडियन्सच्या संघात दिसू शकतो. पण हार्दिकला संघात घेतल्यावर कोणत्या खेळाडूला संघाबाहेर काढायचे, हा मोठा प्रश्न आता मुंबई इंडियन्सपुढे असणार आहे. सध्याच्या घडीला तरी हार्दिकला संघात खेळवायचे असेल तर कृणाल पंड्याला संघाबाहेर काढावे लागेल, असे चित्र दिसत आहे. कारण गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये कृणालला चांगली कामगिरी करता आलेली नाही. पण कायरन पोलार्ड, सौरभ तिवारी यांच्याकडून आतापर्यंत चांगली कामगिरी झाली आहे. त्यामुळे या दोघांना संघाबाहेर काढण्याचा विचार होण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे आरसीबीविरुद्धच्या सामन्यात जर हार्दिकला खेळवायचे असेल, तर कृणालला संघाबाहेर करणे हा पर्याय दिसत आहे. कारण एका अष्टपैलूच्या जागी दुसरा अष्टपैलू खेळाडू संघात येणार असून त्यामुळे संघबांधणीला कोणताही धक्का बसणार नाही. त्यासाठी हाच बदल सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्सच्या संघात होऊ शकतो, अशी शक्यता आहे. हार्दिक पंड्या चांगला सराव करत आहे आणि आता तो पूर्णपणे फिट झाला आहे. त्यामुळे आता आरसीबीविरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात हार्दिक मुंबईच्या संघाकडून खेळू शकतो, अशी आशा आहे. त्यामुळे हार्दिकसारख्या महत्वाच्या खेळाडूला मुंबई इंडियन्सचा संघ या महत्वाच्या सामन्यात खेळवणार नाही, अेस होणार नाही.

Source: https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt20/news/mumbai-indians-can-make-oly-one-big-change-in-tesm-against-royal-challengers-bangalore/articleshow/86516474.cms