मुंबई बातम्या

दहशतवादी हल्ल्याच्या इशाऱ्यानंतर मुंबई पोलिसांचं ऑपरेशन ऑल आऊट, 57 आरोपी अटकेत – News18 लोकमत

मुंबई, 19 सप्टेंबर: मुंबई लोकलमध्ये विषारी वायू (gas attacks) सोडून घातपात करण्याचा दहशतवाद्यांचा (Terrorist) डाव होता, अशी धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर रेल्वे स्टेशनवर (Mumbai Railway Station) बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दरम्यान दहशतवादी हल्ल्याबाबत आलेल्या इशाऱ्यानंतर मुंबई पोलिसांनी ऑपरेशन ऑल आऊट (Operation All out) राबवलं आहे. अनंत चतुर्दशीच्या पूर्वसंध्येला शनिवारी हे ऑपरेशन राबवण्यात आलं.

मुंबई पोलिसांनी राबवलेल्या ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत 57 सराईत आरोपींना अटक केली असून अजामीनपात्र वॉरंटमधील ५५ आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी अंमली पदार्थांच्या विक्री आणि सेवनप्रकरणी 118 जणांवर कारवाई केलीय.

मुंबई पोलिसांनी शहरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एकूण 31 जणांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून चाकू, तलवारी इत्यादी शस्त्रे जप्त करण्यात आलीत. तसंच 48 ठिकाणी छापे टाकण्यात आलेत. अवैध दारू विक्री, जुगार प्रकरणी ही छापेमारी केली आहे. या छापेमारीत 76 आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी या ऑपरेशन दरम्यान 41 आरोपींना अटक केली असून एकूण 160 संशयित व्यक्ती आणि 113 फेरिवाल्यांवर कारवाई केली आहे.

Anant Chaturdashi: अनंत चतुर्दशीला हातावर बांधल्या जाणाऱ्या अनंत सूत्राचं हे आहे महत्त्व

गणपती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त

आज मुंबईतल्या अनेक गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे. यासाठी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. चौपाटी परिसरात गर्दी होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जातं आहे. शहरात आज विशेष बंदोबस्त ठेवला आहे.

पोलिसांसह सशस्त्र पोलीस दलाचे दीड हजार जवान तैनात करण्यात आलेत. तसंच अतिरिक्त कुमकही मागवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 100 अधिकारी, 1500 सशस्त्र पोलीस, राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन कंपन्या, सीआरपीएफची एक कंपनी, 500 गृहरक्षक, 275 अंमलदार बंदोबस्ताला तैनात असणारेत.

IPL पूर्वी ख्रिस गेलनं पाकिस्तानबद्दल केलेल्या वक्तव्यानं खळबळ, Tweet Viral

पोलिसांची नाकाबंदी

मुंबई शहरात शनिवारी 222 ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबवलं गेलं. त्यात अभिलेखावरील 1 हजार 84 आरोपींची तपासणी केली. त्यानंतर 267 आरोपी सापडले. या आरोपींवर प्रतिबंधक कारवाई केली.

पोलिसांनी मुंबई शहरात 136 ठिकाणी नाकाबंदी केली होती. या नाकाबंदीवेळी पोलिसांनी 9,145 वाहनांची तपासणी केली. त्यात 1615 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. यात पाच मद्यपी चालकही सापडले असून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

गणेशभक्तांनो! आज घराबाहेर पडण्याआधी ‘या’ सूचना नक्की वाचा

या ऑपरेशन ऑल आऊटदरम्यान पोलिसांनी शहरातील 946 हॉटेल, लॉज, मुसाफिरखाने यांचीही तपासणी केली. तर 496 महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांची तपासणी करण्यात आली. 63 विसर्जनस्थळांवर घातपातप्रतिबंधक तपासणी करण्यात आली आहे.

Published by:Pooja Vichare

First published:

Source: https://lokmat.news18.com/mumbai/mumbai-police-operation-all-out-in-wake-terror-attack-57-accused-arrested-mhpv-606353.html