मुंबई बातम्या

निर्बंध सैल होताच ‘मुंबई-पुणे’ भरधाव – Sakal

मुंबई : कोरोनाच्या निर्बंधांमुळे गेल्या वर्षी सार्वजनिक वाहतुकीवर बंदी असल्याने मुंबई-पुणे महामार्गावर जानेवारी ते जून या सहा महिन्यांत ६८ अपघात होऊन २८ मृत्यू झाले होते; मात्र या वर्षी याच सहा महिन्यांत १०१ अपघात आणि ५० मृत्यू झाल्याची नोंद महामार्ग पोलिसांनी केली आहे.

हेही वाचा: ‘मी असतो तर कानाखालीच चढवली असती’, राणेंची जीभ घसरली

निर्बंध हटवल्यानंतर पुन्हा मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक सुसाट आहे; मात्र गेल्या चार वर्षांची आकडेवारी बघता हळूहळू अपघात आणि मृत्यूंमध्ये घट होत असून, गेल्या वर्षी अपघाती मृत्यूमध्ये तब्बल ५२ टक्क्यांनी घट झाल्याचा दावा सेव्ह लाइफ फाउंडेशनने (एसएलएफ) केला आहे. मुंबई-पुणे महामार्गावर २०१६ मध्ये २८१ अपघात, तर १५१ मृत्यू झाले होते. त्याप्रमाणेच २०१७ मध्ये ३६० अपघात आणि १०५ मृत्यू, २०१८ मध्ये ३५८ अपघात तर ११० मृत्यू झाले. २०१९ मध्ये ३५३ अपघात, तर ८६ मृत्यू झाले. कोरोनाकाळात गेल्या वर्षी १६० अपघात झाले असून, फक्त ६६ मृत्यू झाले. त्यामुळे गेल्या चार वर्षांतील अपघाती मृत्यूंची तुलना केल्यास गेल्या वर्षी मृत्यूंमध्ये तब्बल ५२ टक्क्यांनी घट झाल्याचा दावा ‘एसएलएफ’ केला आहे.

‘एसएलएफ’, ‘एमएसआरडीसी’ यांनी वतीने सुमारे दोन हजार १५० ‘ब्लॅक स्पॉट’ (अपघाती जागा) शोधले असून, त्यापैकी चौदाशे ठिकाणी अभियांत्रिकी पद्धतीने बदल करून सुधारणा केल्या आहेत. त्यामुळे गेल्या वर्षी लॉकडाउनच्या काळात अपघात आणि मृत्यूच्या संख्येत घट झाल्याचे फाउंडेशनने सांगितले. मुंबई-पुणे महामार्गावरील अपघाती मृत्यू रोखण्यासाठी सेव्ह लाइफ फाउंडेशन, एमएसआरडीसी, महामार्ग पोलिसांच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये भरधाव वाहन चालवणाऱ्या ४६ हजार ५६३ वाहनचालकांवर कारवाई करून दंड केला आहे, तर अपघात रोखण्यासाठी महामार्गावर पूर्णवेळ गस्त घातली जात आहे.

हेही वाचा: राज्याला मोठा दिलासा! दिवसाच्या कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट

आपत्कालीन परिस्थिती उद्‍भवल्यास १०९ अधिकारी तर ७३ कर्मचारी चालकांचे प्रशिक्षण देण्यात आल्याचेही सेव्ह लाइफ फाउंडेशनने सांगितले. गेल्या वर्षी चालकांच्या चुकांमुळे होणाऱ्या अपघाती मृत्यूंच्या घटनांमध्ये सीट बेल्ट न लावल्याने २५ अपघाती मृत्यू झाले. त्याचप्रमाणे अतिवेगामुळे २६ मृत्यू झाले.

गेल्या वर्षी वाहनांच्या अपघातांचे प्रकार

ट्रक ते ट्रक- २० अपघाती मृत्यू

अनोळखी वाहनांनी झालेले अपघाती मृत्यू- चार

कार ते ट्रक- पाच अपघाती मृत्यू

गेल्या वर्षातील अपघाताचे प्रकार

वाहनांची धडक होऊन ३० अपघात

पादचाऱ्यांचे १४ अपघात

सुरक्षा भिंतींना धडकून नऊ अपघात

अतिवेगामुळे सात अपघात

गेल्या वर्षी मृत्यू २१

अतिवेग ११

मार्गिकेची शिस्त मोडल्याने ११

Source: https://www.esakal.com/mumbai/as-soon-as-the-restrictions-are-loosened-mumbai-pune-will-increase-srs97