मुंबई बातम्या

मुंबई ते दिल्ली रेल्वे प्रवास सुसाट; एक्स्प्रेस होणार गतिमान – Sakal

मुंबई : मुंबई ते दिल्ली प्रवास (mumbai to delhi) अधिक वेगवान (traveling) होण्यासाठी भारतीय रेल्वेचे (Indian railway) प्रयत्न सुरू आहेत. यात पश्चिम रेल्वेवरून धावणाऱ्या मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसचा (mumbai-delhi express speed) वेग वाढविण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. मुंबई ते दिल्ली जाण्यासाठी आता 15 तास लागत आहेत. मात्र, मुंबई ते दिल्ली धावणाऱ्या एक्स्प्रेसचा वेग 110 किमी वरून 160 किमी करण्याची योजना आहे. यामुळे 12 तासांत एक्स्प्रेसचा प्रवास होऊन प्रवाशांचे 3 तासांची बचत होणार आहे.

हेही वाचा: कोवीड काळातही मुंबई विद्यापीठात संशोधनाला मिळाली चालना

भारतीय रेल्वेद्वारे मिशन गतिमान प्रकल्प हाती घेतला आहे. यामध्ये एक्स्प्रेसचा वेग वाढविण्यासाठी भर दिली जात आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी 1 हजार 340 कोटी रुपये देण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी 11 हजार 188 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. मार्च 2024 पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. मुंबई ते दिल्ली दरम्यानचे अंतर एकूण 1 हजार 474 किमी आहे.

हे अंतर 12 तासांत पार करण्याचे काम हाती घेतले आहे. मुंबई-दिल्ली-कोलकत्ता-चेन्नई या सुवर्ण चतुष्कोनात देशातील 60 टक्के प्रवासी वाहतूक होती. मुंबई ते दिल्ली मार्गाव एक्स्प्रेस ताशी 110 किमी वेगाने चालविण्याचा प्रकल्प दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाला. त्यानंतर आता 160 किमी वेगाने एक्स्प्रेस धावण्यासाठी पश्चिम रेल्वेने कामे हाती घेतले आहेत. रेल्वे मार्गातील सिग्नल यंत्रणा आणि इतर आधुनिक सुविधा निर्माण केले जाणार आहे. रेल्वे रूळांची कामे, ओव्हरहेड वायर, पादचारी पुलाची कामे हाती घेतली आहेत. या कामाला सप्टेंबर 2020 मध्ये परवानगी मिळाली असून मार्च 2024 मध्ये हे काम पूर्ण करण्याचे ध्येय आहे.

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-delhi-express-mumbai-delhi-journey-indian-railway-speed-nss91