मुंबई बातम्या

मुंबई : मृत्यू संख्या सर्वाधिक – Sakal

मुंबई : कोरोना (Corona) संसर्गाचे हॉटस्पॉट (Hotspot) ठरलेल्या मुंबईत (Mumbai) मृत्यूंची (Death) संख्या आता १५ हजारांहून (Thousands) अधिक आहे. शहराच्या २४ प्रभागांपैकी पाच प्रभागांत (In five divisions) सर्वाधिक मृत्यूची नोंद आहे. शहरात होणारे ५० टक्क्यांहून अधिक मृत्यू (Death) हे या पाच प्रभागातील असल्याची माहिती समोर आली आहे. या पाच प्रभागांमध्ये मृत्यूंची संख्या (Death) सरासरी ९०० च्या वर नोंद केली आहे.

के पूर्व म्हणजेच अंधेरी पश्चिम परिसरात आतापर्यंत हजाराच्या वर १२३९ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला तर एकूण ४६,२०४ रुग्णांची नोंद करण्यात आली. त्याखालोखाल एस प्रभागामध्ये भांडुप परिसरात १०३० मृत्यूंची नोंद करण्यात आली असून, एकूण रुग्णसंख्या ३३,६१० आहे. त्यासह बोरिवली परिसराचा समावेश असणाऱ्या आरसी प्रभागामध्ये ९८४ मृत्यूंची नोंद असून, आतापर्यंत ५१,४३३ रुग्ण नोंदले गेले.

हेही वाचा: नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटलांचं नाव ?;पाहा व्हिडीओ

पालिकेच्या डॅशबोर्डनुसार एकूण पाच प्रभागांमध्ये अधिक मृत्यूंची नोंद झाली. ९६१ मृत्यू झालेल्या गोरेगाव परिसराचा समावेश असणाऱ्या पी दक्षिण प्रभागात एकूण ४४,५४७ रुग्ण नोंदले आहेत. आरएस म्हणजेच कांदिवली परिसरात ९२८ मृत्यू नोंदवण्यात आले, तर ४५,६८८ कोरोना रुग्ण आहेत. दरम्यान, आतापर्यंत मुंबईत एकूण कोरोना रुग्णांची संख्या सात लाख ३८ हजार ५२२ झाली आहे, तर सात लाख १७ हजार १९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

हेही वाचा: मुंबई अनलाॅक , मुंबईतील माॅल अखेर उघडले;पाहा व्हिडीओ

सध्या मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली आहे. ३०० च्या दरम्यान रुग्ण आढळत आहेत. मृत्यूही एकअंकी नोंद होत आहे. १० दिवसांत फक्त ६७ मृत्यूंची नोंद झाली आहे.

मुंबईत सक्रिय रुग्ण दुपटीने घटले असून, सद्यस्थितीत २९२८ रुग्ण आहेत. ही संख्या जुलैमध्ये ४९७२ होती. प्रत्येक प्रभागामध्ये सरासरी २०० पर्यंत सक्रिय रुग्ण नोंदले आहेत.

गेल्या सात दिवसांत कुलाबा म्हणजेच ए प्रभागामध्ये रुग्णवाढीचा दर इतर प्रभागांच्या तुलनेत जास्त नोंदवण्यात आला आहे. मुंबईचा सरासरी रुग्णवाढीचा दर ०.०४ टक्केपर्यंत आहे; पण ए प्रभागामध्ये रुग्णसंख्या कमी असली तरी रुग्णवाढीचा दर ०.०८ टक्के आहे. शिवाय रुग्ण दुपटीचा कालावधीही ९२० दिवसांवर आहे. बाकी सर्व प्रभागामध्ये रुग्ण दुपटीचा दर हजारच्या वर आहे.

https://www.oberoirealty.com/elysian?utm_source=digital&utm_medium=columbia&utm_term=ELYCLM&ad=0_5687660_ba93739e-2c1f-4d68-9646-99dde929f155-1sj4s_048a2f76-1a85-4051-b290-08932c7ed185-1sjd4_1788_58756452_144_348322_1_144_null_null_18_348011_348020_348006_null_1808_34755&col_ci=R132N802j3211629196104603ca3wdix2276kw4wn95v3k

Source: https://www.esakal.com/mumbai/on-an-average-more-than-900-deaths-were-recorded-in-more-than-50000-patients-in-2-wards