मुंबई बातम्या

मुंबई: बॉम्ब ठेवल्याचा बनावट कॉल, २ अटकेत – Times Now Marathi

मुंबई: बॉम्ब ठेवल्याचा बनावट कॉल, २ अटकेत& 

थोडं पण कामाचं

  • मुंबई: बॉम्ब ठेवल्याचा बनावट कॉल, २ अटकेत
  • अटकेतील दोघांपैकी एक ट्रक चालक
  • मुंब्रा जवळच्या शीळ फाटा परिसरातून अटक

मुंबईः मुंबईत बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Bollywood Actor Amitabh Bachchan) यांच्या जुहूच्या बंगल्यावर तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) (CSMT), भायखळा (Byculla) आणि दादर (Dadar) रेल्व स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याचा फोन करुन घबराट उडवून देणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. Bomb threat call at three Mumbai railway stations and Amitabh Bachchan’s bungalow causes scare, security beefed up, two arrested

मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात फोन करुन चार ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र यात तथ्य नसल्याचे आढळून आले. पोलिसांनी ठाणे जिल्ह्यातून दोघांना अटक केली. यापैकी एकजण मराठवाड्यातील ट्रक चालक आहे तर दुसरी व्यक्ती ट्रक चालकासोबत होती, एवढेच पोलिसांनी सांगितले.

बातमीची भावकी

नियंत्रण कक्षात एका मोबाइलवरुन फोन आला होता. यामुळे पोलिसांनी हा मोबाइल नंबर कोणत्या भागात सक्रीय (अॅक्टिव्ह) आहे ते तपासले आणि त्या भागातून ट्रक चालकाला आणि त्याच्या सोबत असलेल्या व्यक्तीला अटक केली. दोघांना ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा जवळच्या शीळ फाटा परिसरातून अटक करण्यात आली. पोलिसांनी अटक केलेल्यांची चौकशी सुरू असल्याचे सांगितले. याआधी बॉम्ब ठेवल्याचा फोन आल्यानंतर पोलिसांनी अमिताभ बच्चन यांचा जुहूचा बंगला तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) (CSMT), भायखळा (Byculla) आणि दादर (Dadar) रेल्व स्टेशन येथील पोलीस बंदोबस्त वाढवला होता. 

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/bomb-threat-call-at-three-mumbai-railway-stations-and-amitabh-bachchans-bungalow-causes-scare-security-beefed-up-two-arrested/357533