मुंबई बातम्या

Mumbai Police Recruitment 2021: मुंबई पोलीस दलात ‘या’ जागांसाठी मोठी पदभरती – News18 लोकमत

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2021 असणार आहे.

  • Share this:

मुंबई, 25 जुलै: मुंबई पोलीस दलात मोठी पदभरती (Mumbai Police Recruitment 2021) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. विधि अधिकारी या पदासाठी ही भरती असणार आहे. पोलीस दलात तब्बल 34 जागांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन अर्ज करायचे आहेत. अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2021 असणार आहे.

या पदासाठी भरती

विधि अधिकारी (Law Officer) –  एकूण जागा 34

शैक्षणिक पात्रता

या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी लॉमध्ये पदवी घेतली असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

अर्ज पाठवण्याबाबतची संपूर्ण माहिती आणि फॉर्म www.mumbaipolice.gov.in या वेबसाईट देण्यात आली आहे.

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख –  05 ऑगस्ट 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.  

Published by:
Atharva Mahankal

First published:
July 25, 2021, 2:39 PM IST

Source: https://lokmat.news18.com/career/mumbai-police-recruitment-2021-openings-for-law-graduates-mham-584145.html