मुंबई बातम्या

IIT-Bombay मध्ये 21 जून पासून विद्यार्थी आणि कर्मचार्‍यांसाठी मोफत कोविड 19 लसीकरण – LatestLY मराठी‎

Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: Pixabay.com)nation)

IIT-Bombay ही मुंबई मधली पहिली शैक्षणिक संस्था आहे ज्यांनी आता विद्यार्थ्यांसाठी कोविड प्रतिबंधात्मक लस (COVID-19 Vaccine) उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आयआयटी बॉम्बेने खाजगी रूग्णालयासोबत टाय अप करून हा लसीकरणाचा उपक्रम हाती घेतला आहे. 21 जून पासून या लसीकरण कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. या लसीकरणामध्ये विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले जाणार नाहीत. त्यामुळे अंदाजे 3 हजार विद्यार्थ्यांचे लसीकरण होणार आहे.

TOI च्या माहितीनुसार सुराणा हॉस्पिटल सोबत टायअप करत आयआयटी बॉम्बे मध्ये हा लसीकरणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. प्रति डोस 780 रूपये असा दर असेल. मागील काही दिवसांपासून आयआयटी बॉम्बे त्यासाठी खाजगी हॉस्पिटल सोबत बोलत होते. मात्र दरांवरून गोष्टी पुढे सरकत नव्हत्या. दरम्यान विद्यार्थ्यांच्या सोबतीने आता आयआयटी बॉम्बेचा स्टाफ, फॅकल्टी यांना देखील याच लसीकरणामध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे. मेस आणि सिक्युरिटी स्टाफ यांना देखील लसीकरण मोहिमेमध्ये समाविष्ट केले जाणार अअहे. त्यासाठी डोनेशन आणि इतर माध्यमांतून आलेला निधी वापरला जाईल असे सांगण्यात आले आहे.

कोविड 19 संकटामध्ये आयआयटी बॉम्बेचं कॅम्पस कोविडमुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करणार्‍या स्टुडंट टास्क फोर्स यांच्या कडून या लसीकरण मोहिमेतही मदत घेतली जाणार आहे.

दरम्यान भारतामध्ये आता 21 जून पासून केंद्र सरकार 18 वर्षांवरील सार्‍यांचेच कोविड 19 लसीकरण मोफत करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी जाहीर केले आहे. सध्या महाराष्ट्रात सरकारी केंद्रांवर 18-44 वयोगटातील लसीकरण बंद आहे.

Source: https://marathi.latestly.com/maharashtra/iit-bombay-to-vaccinate-on-campus-students-from-june-21-for-free-261024.html