मुंबई बातम्या

फर्स्ट स्टॉप बॉम्बे! श्रीलंका दौऱ्यासाठ… – Maha Sports

येत्या जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंका दौरा करणार आहे. १३ जुलैपासून या दौऱ्याची सुरुवात होणार असून उभय संघांना ३ सामन्यांची वनडे आणि ३ सामन्यांची टी२० मालिका खेळायची आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या मालिकेची तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपुर्वीच श्रीलंका दौऱ्यासाठी २० सदस्यीय भारतीय संघाची घोषणा झाली आहे. संघातील सर्व सहभागी खेळाडू श्रीलंकेला रवाना होण्यापुर्वी मुंबई येथे एकत्र जमणार आहेत. तिथे त्यांना १४ दिवसांचा विलगीकरण कालावधी पूर्ण करावा लागणार आहे.

ठराविक नियोजनानुसार १४ जूनपासून सहभागी खेळाडू मुंबईत जमायला सुरुवात झाली आहे. त्यांचे मुंबई विमानतळावरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

भारतीय संघाचा नवनियुक्त कर्णधार शिखर धवनने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर मुंबईला येतानाचा फोटो पोस्ट केला आहे. त्याच्यासोबत संघ सहकारी आणि अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार असल्याचेही दिसत आहे. भुवनेश्वरसोबत त्याची पत्नीही मुंबईला आल्याचे दिसत आहे. एवढेच नव्हे तर, कुलदीप यादव, दीपक चाहर, नितीश राणा हेदेखील मुंबई विमानातळावर असताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

Photo Courtesy: Instagram

श्रीलंकाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकासाठी निवड झालेले सर्व खेळाडू १४ ते २८ जून या कालावधीत मुंबईतील एका हॉटेलमध्ये विलगीकरणार राहणार आहेत. दरम्यान एक दिवसाआड त्यांची आरटी-पीसीआर चाचणी होणार आहे. अर्थात विलगीकरणादरम्यान त्यांच्या तब्बल ६ कोरोना चाचणी करण्यात येतील. त्यानंतर जवळपास ३० जूनपर्यंत भारतीय संघाचा ताफा श्रीलंकेसाठी उड्डाण भरेल. तिथे गेल्यानंतरही त्यांना काही दिवस विलगीकरणार राहावे लागेल. त्यानंतर ते सरावाला सुरुवात करु शकतील.

युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या या भारतीय संघासाठी श्रीलंका दौरा अतिशय महत्त्वाचा असणार आहे. कारण वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थित यजमान संघाला पराभूत करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. याबरोबरच या मालिकेतील प्रदर्शनाच्या आधारे त्यांना आगामी टी२० विश्वचषकात संधी मिळू शकते. त्यामुळे सर्व सहभागी खेळाडू आपले उत्कृष्ट देण्यासाठी झटताना दिसतील.

महत्त्वाच्या बातम्या-

सारा तेंडुलकरने शेअर केला ‘तो’ व्हिडिओ, चाहत्यांना आली शुबमन गिलची आठवण

‘या’ कारणामुळे रोहितसह शुबमनही किवी गोलंदाजांपुढे येणार अडचणीत, माजी अष्टपैलूचा दावा

टी२०चं मैदान गाजवणारे ‘हे’ शिलेदार प्रथमच खेळतायत पीएसएल, रिषभच्या धुरंधराचाही समावेश

Source: https://mahasports.in/indian-players-arrived-in-mumbai-for-sri-lanka-tour-photo-goes-viral-on-social-media/