मुंबई बातम्या

Mumbai Rains Live Update : मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि बीडमध्ये पुढील 3- 4 तासात पावसाची शक्यता – ABP Majha

वसई, विरार, नालासोपाऱ्यात रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने शहरातील सखल भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. नालासोपारा पूर्व आचोळे रोड, सेंट्रल पार्क, धानीव बाग, पश्चिमेकडील गास, टाकी पाडा, वसईतील गोलानी नाका, एव्हरशाईन, वसंत नगरी सर्कल, समता नगर, जे बी नगर, विरार पश्चिम विवा कॉलेज रोडवर गुडघाभर पाणी साचलं आहे. काहींच्या दुकानातही पाणी शिरलं आहे. आज दिवसभरात पावसाचा जोर कायम राहिला तर नागरिकांची चिंता वाढू शकते. 

Source: https://marathi.abplive.com/news/mumbai/mumbai-rain-live-updates-maharashtra-weather-forecast-update-in-marathi-heavy-rain-imd-alert-maharashtra-mumbai-monsoon-updates-990419