मुंबई बातम्या

Mumbai Lockdown News: मुंबई महानगरक्षेत्रात शिथिल झाले निर्बंध; जाणून घ्या आजपासून काय सुरू अन् काय बंद – Lokmat

मुंबई : कडक निर्बंधांनंतर कोरोनाचा संसर्ग आता झपाट्याने कमी होऊ लागल्याने १० टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटिव्हिटी दर असलेल्या राज्यातील २० जिल्ह्यांत १ जूनपासून निर्बंध काहीसे शिथिल करण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या सूचनेनुसार मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिकांनी याबाबतची नियमावली सोमवारी जाहीर केली. आता येथे दुपारी २ वाजेपर्यंत मॉल्स व शाॅपिंग सेंटर वगळून सर्व दुकाने सुरू राहतील.

पालघर जिल्ह्यातील पालघर, वसई ग्रामीण, डहाणू, मोखाडा या भागांत स्टेशनरी, सलून, इलेक्ट्रॉनिक्स, फोटो स्टुडिओ आदी दुकानांना काही अटी-शर्तींवर दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

मुंबईत दुकानांसाठी वेळापत्रक जाहीर
मुंबईतील सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू ठेवण्याची परवानगी पालिका प्रशासनाने दिली आहे. त्यानुसार रस्त्याच्या डाव्या व उजव्या बाजूची दुकाने सुरू ठेवण्याचे वेळापत्रक तयार केले आहे.

ठाणे जिल्ह्यातील दुकाने खुली
ठाणे जिल्ह्यातील त्या-त्या आयुक्तांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दुकाने, आस्थापना आणि उद्योग सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरू करण्यास मान्यता दिली आहे.

नवी मुुंबई : नवी मुंबईमध्येही मॉल्स व शाॅपिंग सेंटर वगळून इतर सर्व एकल दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुुरू ठेवण्यात येणार आहेत.

रायगड : सोमवारी रात्री उशिरापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंधांबाबत आदेश काढले नव्हते. त्यामुळे व्यापारी, दुकानदार व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

-काय बंद?
मॉल
मल्टिप्लेक्स
हॉटेल
व्यायामशाळा
चित्रपटगृह

-काय सुरू?
सर्व अत्यावश्यक वस्तूंची दुकाने
मद्यविक्री
ज्वेलरी
हेअर सलून
सर्व प्रकारची दुकाने
हार्डवेअर

वाचकहो, ‘लोकमत’ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mumbai Lockdown News Mumbai Eases Restrictions after number of corona cases decreases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Source: https://m.lokmat.com/mumbai/mumbai-lockdown-news-mumbai-eases-restrictions-after-number-corona-cases-decreases-a584/