मुंबई बातम्या

नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का, राज ठाकरेंच्या उपस्थितीत बड्या नेत्याचा मनसे प्रवेश – Maharashtra Times

हायलाइट्स:

  • नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का
  • राज ठाकरेंच्या उपस्थितीत बड्या नेत्याचा मनसे प्रवेश
  • आगामी निवडणुकांसाठी राजकीय वातावरण तापलं

नवी दिल्ली : नवी मुंबईत भाजपला मोठा धक्का बसला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंबोली उपशहर अध्यक्ष नितीन काळे (Nitin Kale)यांनी भाजपची साथ सोडत मनसेचा झेंडा हाती घेतला आहे. नितीन काळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत मनसेमध्ये प्रवेश केला. खरंतर, हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

नितीन काळे यांच्या या निर्णयामुळे सध्या राजकीय चर्चा सुरू आहे. तर राज ठाकरे यांनी नितीन काळे यांचं स्वागत करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. असं पाहायला गेलं तर आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर महत्त्वाचं मानलं जात आहे.

भाजप नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश हा खडसेंना धक्का? राजकारण तापलं

खरंतर, गेल्या काही दिवसांआधी भाजपला मुक्ताईनगरमध्येही मोठा धक्का बसला आहे. इथं मुक्ताईनगर नगरपंचायतीमधील खडसे समर्थक ६ नगरसेवकांनी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आपल्या मनगटावर शिवबंधन बांधलं. शिवसेनेने जळगाव महापालिकेत सत्तांतर केल्यानंतर आता पाठोपाठ मुक्ताईनगर नगरपंचायतीवर झेंडा फडकविण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान ४ भाजप आणि १ अपक्ष अशा ५ नगरसेवकांनीच पक्षांतर केल्याची माहीती खडसे यांनी दिली आहे.

मुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. १७ पैकी १३ नगरसेवक भाजपचे, ३ शिवसेनेचे तर १ अपक्ष नगरसेवक आहे. अपक्ष नगरसेवकाने भाजपला पाठिंबा दिल्याने संख्याबळ १४ झाले आहे. येथील नगराध्यक्षा नजमा तडवी यांच्यासह सत्ताधारी गटातील नगरसेवक हे खडसे गटाचे समर्थक आहेत. खडसेंनी भाजपा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र, भाजपात असलेले नगरसेवक खडसेंच्या गटाचेच मानले जातात.

image‘मराठा, OBC आरक्षणाविरोधात भाजपच लोकांना कोर्टात पाठवतोय’

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/navi-mumbai-big-leader-left-bjp-and-joined-mns-in-the-presence-of-raj-thackeray/articleshow/83108579.cms