मुंबई बातम्या

‘मुंबई प्रारुपाची अंमलबजावणी कधी?’ – Loksatta

मुंबई : करोनास्थिती हाताळण्याच्या मुंबई पालिकेच्या व्यवस्थापनाचे उच्च न्यायालयाने गुरुवारी पुन्हा कौतुक केले. त्याचवेळी मुंबई प्रारुप अन्य ठिकाणी राबवण्याचे आदेश देऊनही ते अद्याप का राबवण्यात आलेले नाही, याबाबत मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची अन्य पालिका आयुक्तांना मार्गदर्शन करणारी ऑनलाईन बैठक का आयोजित करण्यात आली नाही, अशी विचारणाही न्यायालयाने राज्य सरकारला केली.  करोना उपचारांतील गैरव्यवस्थापनाबाबत दाखल जनहित याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती अमजद सय्यद आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने पालिकेच्या कामाचे कौतुक केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on May 28, 2021 1:38 am

Web Title: implementation of the mumbai model akp 94

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/implementation-of-the-mumbai-model-akp-94-2482838/