मुंबई बातम्या

मुंबई शहराला “युनेस्को क्रिएटिव्ह सिटी फॉर फिल्म”चा दर्जा, लोगोचे महापौरांच्या हस्ते अनावरण – TV9 Marathi

मुंबई शहराला प्राप्त झालेल्या “युनेस्को क्रिएटिव्ह सिटी फॉर फिल्म” च्या लोगोचे अनावरण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयातील महापौर दालनात आज 28 एप्रिल 2021 रोजी पार पडले. UNESCO Creative City for Film

kishori pednekar

मुंबईः संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनेस्को) शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक परिषदेत सृजनशील संलग्न शहरामध्ये मुंबईचा चित्रपट श्रेणीमध्ये समावेश झाला असून, मुंबई शहराला “युनेस्को क्रिएटिव्ह सिटी फॉर फिल्म” ही ख्याती प्राप्त झालीय. मुंबई शहराला प्राप्त झालेल्या “युनेस्को क्रिएटिव्ह सिटी फॉर फिल्म” च्या लोगोचे अनावरण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते महापालिका मुख्यालयातील महापौर दालनात आज 28 एप्रिल 2021 रोजी पार पडले. (Mumbai unveils logo of “UNESCO Creative City for Film”)

मुंबई शहर हे चित्रपटांचे माहेरघर

मुंबई शहर हे चित्रपटांचे माहेरघर आहे. या क्षेत्रात मुंबई शहराचा जागतिक स्तरावर नावलौकिक आहे. चित्रपट निर्मितीत मुंबई शहर अग्रगण्य असून, सर्वात मोठी चित्रपटनगरी म्हणून मुंबई शहराची ओळख आहे.बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना चित्रपटसृष्टीचे ज्ञान प्राप्त व्हावे तसेच या संबंधित उद्योगांबाबत माहिती प्राप्त व्हावी, याकरिता मराठी चित्रपट महामंडळ आणि व्हिसलिंग वुड्स यांच्या सहकार्याने माहितीपट आणि परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे. तसेच भविष्यकाळात इतर सृजनशील शहरांसोबत सामंजस्य करार करण्याचे विचाराधीन आहे.

महामंडळे, शैक्षणिक संस्था यांच्यासोबत समन्वय साधणार

युनेस्को अंतर्गत आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये तसेच परिसंवादांमध्ये मुंबई शहराचा सक्रिय सहभाग आहे. या सर्व उपक्रमाकरिता बृहन्मुंबई महानगरपालिका राज्य शासनाच्या चित्रनगरी, प्रोडूसर गिल्ड ऑफ इंडिया, चित्रपट जगतामधील दिग्गज मंडळी, संबंधित महामंडळे, शैक्षणिक संस्था यांच्यासोबत समन्वय साधत आहे.

कोरोना लस केंद्रावर उपलब्ध आहे की नाही, याची माहिती घेऊनच लस घेण्यास जा

तर दोनच दिवसांपूर्वी किशोरी पेडणेकरांनी कोरोनासंदर्भातली उपाययोजनांची माहिती दिली होती. ज्यात कोरोना लसीकरण साठा जसा उपलब्ध आहे, त्याप्रमाणे लस दिली जात आहे. कोरोना लस केंद्रावर उपलब्ध आहे की नाही, याची माहिती घेऊनच लस घेण्यास जावे. तसेच सध्या तरी घरोघरी जाऊन लस देण्याचा मुंबई महापालिकेचा विचार नाही. मात्र वस्तीपातळीवर जाऊन लस देण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

मुंबईत दर दिवसाला 1 लाख लस देण्याबाबत प्रयत्न

मुंबईत सध्या तरी 30 ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरु आहेत. तर 60 खासगी ठिकाणी लस दिल्या जात आहे. सध्या तरी मुंबईत दुसऱ्या कोरोना डोसला सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. येत्या 1 मेपासून 18 वर्षावरील सर्वांना लस दिली जाणार आहे. जे पहिले येतील त्यांना लस दिली जाईल. सध्या मुंबईत अनेक ठिकाणी लसीकरण सुरु आहे. खासगी रुग्णालयातही लसीकरण केले जात आहे, अशी माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली.

संबंधित बातम्या

लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याकडून कौतुक, सोबत काम करण्याचीही ऑफर; जाणून घ्या ‘या’ गायकाचा किस्सा!

Prateik Babbar | आईला दिली हृदयात जागा! प्रतीक बब्बरने छातीवर कोरला स्मिता पाटीलच्या नावाचा टॅटू

Mumbai unveils logo of “UNESCO Creative City for Film”

Source: https://www.tv9marathi.com/entertainment/mumbai-unveils-logo-of-unesco-creative-city-for-film-446735.html