मुंबई बातम्या

चांगली बातमी! मुंबईत कोव्हिशील्डचे दीड लाख डोस उपलब्ध, उद्या सर्व लसीकरण केंद्रे होणार सुरू – Maharashtra Times

मुंबई: करोना संसर्गाशी लढणाऱ्या मुंबईकरांसाठी दिलासा देणारे वृत्त आहे. ते म्हणजे मुंबईकरांना आता कोव्हिशील्ड लसींचे दीड लाख डोस उपलब्ध झाले आहेत. ही माहिती मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली आहे. उद्या मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रे सुरु होणार असल्याचेही ते म्हणाले. कोव्हिशील्ड लस उपलब्ध झाली असली तरी देखील कोव्हॅक्सिनचा साठा मात्र मर्यादित आहे. यामुळे ही लस ठराविक केंद्रांवर फक्त दुसरा डोस घेणाऱ्यांसाठीच उपलब्ध असणार आहे. (one and a half lakh doses of covishield are available in mumbai all vaccination centers will start tomorrow)

मुंबईत ७ खासगी रुग्णालये आणि ३० सरकारी रुग्णालये आणि लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण सुरू आहे. मुंबईत अशा एकूण ३७ ठिकाणी आज लसीकरण सुरु होते. ही माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. लोकांनी आधी चौकशी करावी आणि मगच लस घेण्यासाठी जावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. मुंबईत लसींचा साठा टप्प्याटप्प्याने उपलब्ध होत आहे. आधी चौकशी करुन लसीकरण केंद्रावर गेल्यास लोकांची गैरसोय आणि धावपळ होणार नाही असे त्यांनी सांगितले. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत कुठे कुठे लसीकरण सुरू आहे याची माहिती दिली. यावेळी त्यांनी लसीकरण सुरू असलेल्या खासगी आणि सरकारी किंवा पालिकेच्या रुग्णालय आणि केंद्रांची यादीच प्रसिद्ध केली.

क्लिक करा आणि वाचा- प्रामाणिकपणाचे उदाहरण; रोजंदारी कर्मचाऱ्यांनी ९७,५०० रुपयांच्या नोटा केल्या परत

महापालिकेच्या माध्यमातून लसीकरण सुरू असलेली मुंबईतील रुग्णालये

> जेजे रुग्णालय
> बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय
> कस्तुरबा रुग्णालय
> केईएम रुग्णालय
> टाटा रुग्णालय
> एसएआयएस रुग्णालय
> व्ही. एन. देसाई रुग्णालय
> भाभा रुग्णालय
> हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर
> कूपर रुग्णालय
> टोपीवाला रुग्णालय
> गोकुळधाम प्रसुतीगृह
> मीनाताई ठाकरे लसीकरण केंद्र
> सखापाटील रुग्णालय
> मालवणी सरकारी रुग्णालय
> चोक्सी प्रसूतीगृह
> आप्पापाडा प्रसूती रुग्णालय
> आंबेडकर रुग्णालय
> आकुर्ली प्रसूतीगृह
> क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय
> शताब्दी रुग्णालय

क्लिक करा आणि वाचा- माजी मंत्री संजय देवतळे यांचे निधन, करोनाच्या उपचारादरम्यान आला हृदयविकाराचा झटका

खाजगी रुग्णालये

> मित्तल रुग्णालय
> क्रिटिकेअर रुग्णालय
> तुंगा रुग्णालय
> लाईफलाईन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल
> शिवम रुग्णालय
> कोहिनूर रुग्णालय
> एनलॉक्स रुग्णालय या खासगी रुग्णालयांमध्ये आजही लसीकरण सुरू आहे.

क्लिक करा आणि वाचा- रेमडेसिवीरमागे धावू नका, खात्रीशीर उपयोग नाही : खासदार विखेंची भूमिका बदलली

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/one-and-a-half-lakh-doses-of-covishield-are-available-in-mumbai-all-vaccination-centers-will-start-tomorrow/articleshow/82244687.cms