मुंबई बातम्या

Weekend Lockdown Mumbai : रस्त्यांवर शुकशुकाट, वाहनांची वर्दळ थांबली, ‘मुंबई’त कडकडीत ‘लॉक’डाऊन! – TV9 Marathi

कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. (rush of vehicles stopped, strict ‘lock down’ in ‘Mumbai’!)

1/7

कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊनची घोषणा केली आहे. या घोषणेअंतर्गत 30 एप्रिलपर्यंत प्रत्येक आठवड्याच्या शनिवार-रविवारी लॉकडाऊन लागू असेल. काल शुक्रवारी दिवसभरात संपूर्ण महाराष्ट्रात 58,993 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

2/7

Mumbai weekend lockdown

या वीकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मुंबई पुन्हा एकदा शांत झाल्याचं चित्र आहे. तर एकट्या मुंबईमध्ये शुक्रवारी 9200 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

3/7

नेहमी वरदळ आणि गर्दी असलेल्या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळतोय. शुक्रवारी मुंबईत एकूण 35 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

4/7

Mumbai weekend lockdown

एवढंच नाही तर तुम्ही कामानिमित्त घराबाहेर रस्त्यांवर पडणार असाल तर पोलिसांकडून तुमची विचारपूस केली जाणार आहे.

5/7

Mumbai weekend lockdown

ब्रेक दि चेनच्या आदेशात म्हटल्याप्रमाणे आवश्यक सेवा सुरु राहतील. कोणताही व्यक्ती योग्य कारणांशिवाय फिरू शकणार नाही. ही कारणे आदेशात नमूद आहेत.

6/7

Mumbai weekend lockdown

राज्यात सोमवारी सकाळी 7 पर्यंत कडकडीत बंद असणार आहे.

7/7

Mumbai weekend lockdown

एकूणच वीकेंड लॉकडाऊनला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद बघायला मिळतोय.

Source: https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/rush-of-vehicles-stopped-strict-lock-down-in-mumbai-434749.html