मुंबई बातम्या

आठवडाभरात मुंबईत कोरोनामुळे ६९ मृत्यू – Sakal

मुंबई – राज्यात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मागील आठवडाभराची मृत्यूची आकडेवारी पाहिल्यास राज्यात एकूण ७७३ मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. म्हणजे दिवसाला सरासरी ७० मृत्यू झाले आहेत. तर मुंबईत ही मागील आठवडाभरात ६९ मृत्यू झाले असून दिवसाला सात मृत्यूंची नोंद झाली आहे. दरम्यान ,रुग्णसंख्या वाढत असून मृत्यू ही वाढणार असा इशारा कोरोना राज्य टास्क फोर्स समितीतील तज्ज्ञ देत आहेत. मात्र, मास्क पासून कोरोना चाचण्यांपर्यंत सर्वसामान्यांनी महामारीला हलक्यात घेतल्याने असा परिणाम दिसत असल्याचे ही मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. 

‘आता काही होईल ते होऊ दे, ठराविक काळात चाचणी का करायची, मास्क नाकातोंडाच्या खाली हनुवटीवर वापरणे, आणि औट घटकेला रुग्णालयात दाखल होणे अशी कारणे रुग्णांना मृत्यूकडे नेत असल्याचे निरीक्षण मांडण्यात येत आहे. दरम्यान, मागील आठवडाभराचा अभ्यास केल्यास राज्यात आठवड्याभरात 773 मृत्यू झाले आहेत.

 २५ दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत २० टक्क्यांची वाढ

म्हणजे दिवसाला 100 मृत्यू नोंदवण्यात आले. तसेच मुंबईत आठवड्यात 69 मृत्यू आहेत. सप्टेंबर मध्ये ही एवढा उच्चांकी अंक नव्हता. मृत्यू दर नियंत्रणात आहे, मात्र रुग्णांची संख्या वाढत गेल्यास मृत्यू देखील वाढत जातात. याचा परिणाम 14 दिवसांनी पाहायला मिळतो, असे राज्य कोरोना टास्क फोर्स सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

आघाडीत बिघाडी निर्माण करणाऱ्या विधानावरून संजय राऊतांचा ‘यू टर्न’

आठवडाभरातील मृत्यू : 
राज्याच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात शनिवारी 166 करोना मृत्यू, शुक्रवारी राज्यात 112, गुरुवारी 111, बुधवारी 95 मंगळवारी 132, सोमवारी 58 तर  मागील रविवारी 99 असे एकूण 773 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. तर एकट्या मुंबईत रविवारी 10, सोमवारी 10, मंगळवारी 8, बुधवारी 6, गुरुवारी 13, शुक्रवारी 10, शनिवारी 13 असे एकूण 69 मृत्यू आहेत. 

(संपादन – दीनानाथ परब)

Source: https://www.esakal.com/mumbai/sixtynine-people-death-mumbai-because-corona-424545