मुंबई बातम्या

mumbai hospital fire : मुंबईतील भांडुप आग प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल – Maharashtra Times

हायलाइट्स:

  • मुंबईतील भांडुप रुग्णालय आग प्रकरण
  • मॉल आणि हॉस्पिटल व्यवस्थापनाविरोधात गुन्हा
  • भांडुप पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
  • रुग्णालयातील आगीत ११ जणांचा मृत्यू

मुंबई: भांडुप येथील ड्रीम्स मॉलमध्ये आग लागून रुग्णालयातील ११ जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी भांडुप पोलिसांनी मॉल आणि रुग्णालय व्यवस्थापनाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये मॉलचे संचालक राकेशकुमार कुलदीपसिंग वाधवान, निकिता अमितसिंग त्रेहान, सारंग राकेश वाधवान आणि दीपक शिर्के यांच्यासह व्यवस्थापनातील इतर व्यक्ती, तसेच प्रिव्हिलेज हेल्थ केअर सर्व्हिसेस आणि सनराईज हॉस्पिटलचे संचालक अमितसिंग त्रेहान, स्विटी जैन आणि व्यवस्थापनातील इतर व्यक्तींचा समावेश आहे.

ड्रीम मॉल आग निष्काळजीपणातून; पोलिस आयुक्त नगराळे म्हणाले…

आग निष्काळजीपणामुळे लागली’

भांडुप येथील ड्रीम्स मॉलमध्ये गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. या आगीत सनराइज रुग्णालयातील ११ जणांचा मृत्यू झाला. ही आग तब्बल २० तासांनी विझविण्यात यश आले. आगीच्या घटनेनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. निष्काळजीपणातून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यावेळी रुग्णालय प्रशासन आणि जबाबदार असलेल्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.












देवेंद्र फडणवीस यांचं ड्रीम मॉल आगीवरून मुंबई महापालिकेवर टीकास्त्र

imageड्रीम्स मॉल आग: मुख्यमंत्री स्वत: घटनास्थळी, दिले ‘हे’ आदेश

Source: https://maharashtratimes.com/crime-news/mumbai-hospital-fire-mumbai-police-registers-fir-in-fire-case-at-sunrise-hospital-in-bhandup/articleshow/81720261.cms