मुंबई बातम्या

rain in mumbai: मुंबई, परिसरात मुसळधार पाऊस, सोसाट्याच्या वाऱ्यासह विजाही चमकल्या – Maharashtra Times

मुंबई: मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली असून पुढील तीन तास पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. पावसाबरोबरच जोराची हवा सुरू असल्याने हवेत गारवाही निर्माण झाला आहे. दरम्यान, अचानक पावसाला सुरुवात झाल्याने नागरिकांची त्रोधातिरपीट उडाली.

येत्या तीन तासांमध्ये मुंबई आणि परिसरातील अनेक भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस, पिकाचे नुकसान

राज्यात अनेक ठिकाणी पाऊस कोसळला असून काही भागांमध्ये गारपीटीही झाली. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याचे वृत्त आहे. परिसरात सगळीकडे गारांचा खच पडला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा, मका अशा पिकांचे नुकसान झाले आहे.जालना जिल्ह्यात गारपीट

क्लिक करा आणि वाचा- coronavirus in maharashtra: राज्यात आज ५,४२७ नव्या रुग्णांचे निदान, ३८ मृत्यू

नाशिकलाही जोरदार पावसाची हजेरी

नाशिकमध्येही अवकाळी पावसाने मोठा तडाखा दिला असून नाशिकमधील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. लासलगाव परिसरातही जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. तसेच अंतापूर, ताहराबाद, पिंगळवाडे परिसरात गारांसह पाऊस कोसळला.

नाशिक जिल्ह्यात गारपीट

क्लिक करा आणि वाचा- करोना वाढतोय; अमरावती जिल्ह्यात लॉकडाउन जाहीर, अत्यावश्यक सेवा वगळल्या

अहमदनगर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली असून, काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे.

क्लिक करा आणि वाचा- सुधीर मुनगंटीवार यांनी साधला नाना पटोलेंवर निशाणा, म्हणाले…

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-news-updates-mumbai-suburban-and-other-parts-of-maharashtra-witnessed-rain-gusty-winds-with-lightning-and-hailstorm/articleshow/81094491.cms