मुंबई बातम्या

नेटफ्लिक्सच्या प्रेक्षकांना मिळणार महिला दिनाची भेट – Sakal

मुंबई – आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणजेच ८ मार्चला नेटफ्लिक्सवर एक खास वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शिका आणि लेखिका अलंकृता श्रीवास्तव ही नेहमीच महिलांच्या समस्या चित्रपटांमधून मांडत असते. तिचा ‘लिपस्टीक अंडर माय बुर्खा’ हा चित्रपट महिलांच्या अंतरंगातील भावना सांगणारा होता.

समाजातील रूढी, परंपरा, लोकांच्या महिलांबद्दल असणाऱ्या भावना, समाजातील वाईट प्रवृत्ती असणारी माणसं या सगळ्याला सामोरं जाऊन महिला आपलं आयुष्य कशा जगत असतात यावर भाष्य करणारी नवी वेब सिरीज म्हणजे ‘बॅंम्बे बेगम’. 

”बॅंम्बे बेगम’ या वेबसिरीजचे कथानक मुंबईमध्ये राहणाऱ्या ५ महिलांवर लिहीले गेले आहे. या महिलांच्या मॉर्डन विचारांना, महत्त्वकांक्षेला तसेच संघर्ष आणि संवेदनांना यातून दाखवण्यात आलं आहे. सिरीजच्या कथेला भारतातल्या आणि भारताबाहेरील महिलाही स्वत:सोबत जोडू शकतील. वेब सिरीजच्या कथा समाजात काम करणाऱ्या अशा भारतीय महिलांची आहे ज्या महत्वकांक्षी आहेत. तसेच त्यांना पावर आणि यश हवे आहे. पण त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यात त्यांच्या दैनंदिन जीवनातील समस्या मांडण्यात आल्या आहेत. यामध्ये काहींची स्वप्न पुर्ण होतात तर काहींची अर्धवट राहतात ‘ असे या चित्रपटाची  दिग्दर्शिका आणि लेखिका अलंकृता श्रीवास्तव हीने सांगितले. 

हेही वाचा : शाहरुखपासून दीपिकापर्यंत.. अनुष्काच्या वामिकासाठी सेलिब्रिटींनी पाठवले ‘हे’ महागडे गिफ्ट्स

वेब सिरीजमध्ये पूजा भट्ट, शाहाना गोस्वामी, अमृता सुभाष आणि राहुल बोस हे कलाकार मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. या वेब सिरीजचे पोस्टर नेटफ्लिक्सने सोशल मिडीयावर काही दिवसांपूर्वी पोस्ट केले होते. 

हे वाचा – दिया मिर्झा दुसऱ्यांदा बांधणार लग्नगाठ; जाणून घ्या कोण आहे तिचा होणारा पती?

मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिध्द अभिनेत्री अमृता सुभाष ही सॅक्रेड गेम्स नंतर ‘बॅंम्बे बेगम’मध्ये वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे अमृताचा या वेब सिरीजमधील अभिनय पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. वेब सिरीज महिलांवर आधारित असल्यामुळे ती महिला दिनला नेटप्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक या वेब सिरीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.
 

Source: https://www.esakal.com/manoranjan/bombay-begums-release-date-netflix-original-webseries-womens-day-409030