मुंबई बातम्या

राज्यपालांची मर्जी राखण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूची ‘खास’ रणनीती – Sakal

मुंबई : मुंबई विद्यापीठातील सिनेट सदस्यांनी केंद्रातील आयआयएफसीएल या कंपनीला मुंबई विद्यापीठाची सल्लागार कंपनी म्हणून नेमण्यास विरोध केलेला असतानाच या कंपनीच्या नेमणुकीसाठी विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. सुहास पेडणेकर यांनी रणनीती आखली आहे.

राज्यपालांची मर्जीला राखली जावी यासाठी पेडणेकरांनी आज 11 वाजता होत आलेल्या मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत आयआयएफसीएल ही कंपनी किती फायद्याची आहे, याची महती पटवून देण्यासाठी कुलगुरूंनी जोरदार तयारी केली असल्याचे सांगण्यात येते.

VIDEO : रात्री दोन वाजल्यापासून एकामागून एक 12 स्फोट; मीरा रोड हादरलं भयंकर स्फोटांनी

रणनीतीचा भाग म्हणून विद्यापीठाकडून यासाठीच आज व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत केवळ एकच विषय ठेवण्यात आला आहे. सुरुवातीला या विषयावरील प्रस्ताव आणि त्यातील मुद्यावर चर्चा होईल, त्यादरम्यान मर्जीतल्या काही व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांकडून याला विरोध होणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचे सांगण्यात येते. यामुळे आज होत असलेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा प्रस्ताव युवासेना आणि विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांकडून कितीही विरोध झाला तरी तो विरोध डावलून हा प्रस्ताव मंजूर केला जाणार असल्याचे सांगण्यात येते.

मागील महिनाभरापासून केंद्रातील आयआयएफसीएल या कंपनीला सल्लागार म्हणून नेमण्यात येऊ नये, यासाठीची मागणी विविध विद्यार्थी संघटना तसेच सिनेट सदस्यांनी केली आहे. 11 जानेवारी रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा विषय सदस्यांनी थेट नाकारला होता. विद्यापीठांमध्ये स्वतःची यंत्रणा असताना आणि अनेक तज्ज्ञ अभियंता असताना अशा प्रकारच्या कंपनीची गरजच काय आहे, अशी भूमिका मांडली होती. मात्र त्यानंतरही आज हा विषय चर्चेला येत असल्याने यावर मोठ्या प्रमाणात खडाजंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा : पायाखालची जमीन सरकावणारा अहवाल; तुम्ही भरवशाने ज्या रुग्णालयांमध्ये जातात ती रुग्णालयंच आहेत धोकादायक

असे आहेत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य

मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद मध्ये एकूण 18 सदस्य आहेत. यामध्ये प्राचार्य, विभागप्रमुख विद्यार्थी, संस्थाचालकांचे प्रतिनिधी, यासोबतच कुलसचिव आदींचा समावेश असतो. व्यवस्थापन परिषदेचे अध्यक्षपद हे कुलगुरूकडे असते. या बैठकीला सुमारे 18 आणि त्याहून अधिक सदस्य प्रत्येक वेळी उपस्थित असतात. मात्र आज त्या उपस्थितांची संख्या अधिक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

mumbai  news Mumbai University Vice Chancellors strategy to please the Governor

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-news-mumbai-university-vice-chancellors-strategy-please-governor-406930