मुंबई बातम्या

मोठी बातमी : मुंबई महापालिकेच्या सर्व शाळांचं नाव बदलणार – TV9 Marathi

महापालिकेच्या शाळांचं नामांतर (BMC School) करण्याचा निर्णय आज मुंबई महापालिकेने घेतला आहे. | BMC schools will be renamed

मुंबई महापालिका मुख्यालय

मुंबई :  शाळासंदर्भात मुंबई महापालिकेने बजेटमध्ये (BMC) मोठा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या शाळांचं नामांतर (BMC School) करण्याचा निर्णय आज महापालिकेने घेतला आहे. इथून पुढे पालिकेच्या शाळा या मुंबई पब्लिक स्कूल नावाने ओळखल्या जातील. महापालिकेच्या बजेटवेळी (BMC Budget 2021-2022) हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. (All Mumbai Municipal Corporation schools will be renamed BMC Decision)

देशाच्या बजेटनंतर आता आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचं 2021 आणि 2022 चं वार्षिक बजेट जाहीर झालं. या बजेटमध्ये शिक्षण विभागासाठी 2945 कोटींची तरतूद करण्यात आलीय. यावेळी महत्त्वपूर्ण घोषणा करताना महापालिकेच्या शाळांच्या नामांतराची घोषणा करण्यात आली. आता पालिकेच्या शाळा या मुंबई पब्लिक स्कूल नावाने ओळखलं जाणार आहेत.

बजेटमधील काही महत्त्वाचे मुद्दे

शिक्षण विभागाचे  2945 कोटींचा बजेट जाहीर झाले. तसंच येणाऱ्या काळामध्ये शिक्षण विभागात नवीन योजना आणणार. शाळांमध्ये कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर 19 आरोग्य विषयक अत्यावश्यक साधनांचा पुरवठ्यासाठी 15 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय. कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आता सॅनिटायझर, साबण विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे.

मुंबई महापालिकेच्या नवीन 24 माध्यमिक शाळा सुरू होणार

मुंबई महापालिका दहा नवीन सीबीएसई शाळा सुरू करणार आहे.  यासाठी बजेटमध्ये पैशांची तरतूद केली गेली आहे.मुंबई शहरात 2, पश्चिम उपनगरात 3, तर पूर्व उपनगरात 5 अश्या एकूण 10 शाळा सुरु करण्याचा मानस मुंबई महापालिकेचा आहे.

खासगी शाळांच्या अनुदानासाठी  380 कोटी, शालेय वस्तूंचा मोफत पुरवठ्यासाठी 88 कोटींची तरतूद,  उच्च माध्यमिक शाळांमधल्या विद्यार्थ्यांसाठी करिअर कॉन्सिलींग कार्यक्रम Whatsapp आणि Chat bot द्वारे राबवणार असल्याचंही बजेटमधून सांगण्यात आलं.

वैयक्तिक मार्गदर्शनासाठी मे 2021 पासून ‘करिअर टेन लॅब’ या संस्थेमार्फत नियोजन आहे. ज्यामध्ये महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया पार पाडण्याकरता मार्गदर्शन केलं जाईल. यासाठी बजेटमध्ये 21.10 लाखांची तरतूद केली गेली आहे. महापालिका शाळेतील 1300 वर्गखोल्या डिजीटल क्लासरुम होणार  असून त्यासाठी 28.58 कोटी रुपयांची तरतूद  केली गेली आहे.

(All Mumbai Municipal Corporation schools will be renamed BMC Decision)

हे ही वाचा :

VIDEO | सहआयुक्त पाणी समजून सॅनिटायझर प्यायले, बजेट सादर करताना गंभीर बाब

Source: https://www.tv9marathi.com/maharashtra/all-mumbai-municipal-corporation-schools-will-be-renamed-bmc-decision-388188.html