मुंबई बातम्या

IPL 2021: मुंबई इंडियन्सने या अनुभवी खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता; जाणून घ्या संपूर्ण यादी – Maharashtra Times

नवी दिल्ली: IPL 2021 आयपीएलचे सर्वाधिक विजेतेपद मिळवणारे तसेच विद्यमान विजेते मुंबई इंडियन्स (mumbai indians) संघाने या वर्षी होणाऱ्या आयपीएलसाठी रिटेन आणि रिलीझ खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या यादीत मुंबई इंडियन्स संघाने एक मोठा धक्का दिला आहे.

वाचा- अखेर स्टीव्ह स्मिथला बसला झटका; कर्णधारपदावरून हकालपट्टी

जागतिक क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाजांमध्ये आघाडीवर असेल्या अनुभवी श्रीलंकाचा लसित मलिंगा याला मुंबई इंडियन्स संघाने रिलीझ केले आहे. मुंबईने जेम्स पॅटिसन आणि नाथन कुल्टर नाइल यांना देखील रिटेन केले नाही.

वाचा- ICC क्रमवारीत ऋषभ पंतने सर्वांना मागे टाकले; विराट कोहली चौथ्या क्रमांकावर घसरला

गेल्या वर्षी करोनामुळे आयपीएलचे आयोजन युएईमध्ये करण्यात आले होते. मलिंगाने वैयक्तीक कारणामुळे स्पर्धेतून माघार घेतली होती. त्याने करोना काळात कुटुंबासोबत राहणार असल्याचे म्हटले होते. मुंबईने आयपीएल २०२० मध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादव, सौरव तिवारी आणि धवल कुलकर्णी यांना रिटेन केले आहे.

वाचा- टिम पेनचा माज उतरला; ऑस्ट्रेलियातील मीडियाने वास्तवाची जाणीव करून दिली

मुंबई इंडियन्सने रिटेन केलेले खेळाडू

रोहित शर्मा, क्विंटन डीकॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन, ख्रिस लिन, अनमोलप्रीत सिंह, सौरव तिवारी, अदित्य तरे, कायरॉन पोलार्ड, हार्दिक पंड्या, क्रुणार पंड्या, अनुकूल रॉय, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चाहर, जयंत यादव, धवल कुलकर्णी आणि मोहसिन खान

वाचा- ‘टीम इंडिया, फार जल्लोष करू नका; दोन आठवड्यांनी खरी कसोटी आहे’

रिलीझ केलेले खेळेडू

लसित मलिंगा, मिशेल मेक्लेनाघन, जेम्स पॅटिंसन, नाथन कुल्टन नाइल, सेर्फने रादरफोर्ट, प्रिंस बलवंत रॉय, दिग्विजय देशमुख हे सर्व खेळाडू लिलावासाठी उपलब्ध असतील.

वाचा- या गोष्टीमुळे फक्त भारतीय नव्हे तर संपूर्ण जग अजिंक्यचे कौतुक करतय; पाहा व्हिडिओ

Source: https://maharashtratimes.com/sports/cricket/cricket-news/ipl-2021-mumbai-indians-released-lasith-malinga-for-the-upcoming-ipl-auction/articleshow/80368856.cms