मुंबई बातम्या

नव्या उच्चांकाने दलाल स्ट्रीटवर दिवाळी, जाणून घ्या मुंबई शेअर बाजाराबाबत रंजक माहिती – Sakal

मुंबई : कोरोनानंतर संपूर्ण भारतात लॉकडाऊन सुरु आलं. भारतात लॉकडाऊन लागल्यानंतर मुंबई शेअर बाजारात कमालीची घसरण झाली. मात्र, अनलॉक होत असताना शेअर बाजार काही महिन्यात पूर्ववत झाला. केवळ पूर्ववत झाला नाही तर शेअर बाजार नवनवे उच्चांक गाठतोय.

शेअर बाजारावर जगभरातील घटनांचे पडसाद मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली, याचे मुंबई स्टॉक मार्केटवर सकारात्मक परिणाम पाहायला मिळालेत. आज मुंबई शेअर बाजाराने नवा उच्चांक प्रस्थापित केलाय. मुंबई शेअर बाजाराने आज पन्नास हजारांचा टप्पा पार केलाय.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या निमित्ताने मुंबई शेअर बाजाराबाबत काही रंजक माहिती जाणून घेऊयात.    

  1. 1875 मध्ये नेटिव्ह शेअर्स अँड स्टॉक ब्रोकर असोसिएशन म्हणून BSE ची सुरवात झाली 
  2. BSE हे भारतातील पाहिलं अधिकृत लिस्टेड स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच शेअर बाजार आहे
  3. 6 मायक्रो सेकंद इतका कमी वेग असणारं ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंज’ हे आशिया खंडातील पहिलं आणि सर्वात जलद स्टॉक एक्सचेंज आहे
  4. 19 व्या शतकातील प्रभावशाली उद्योगपती प्रेमचंद रॉयचंद यांनी मुंबई शेअर बाजाराची स्थापना केली
  5. त्यांना त्याकाळी ‘बिग बुल’ म्हणून देखील ओळखलं जायचं
  6. ते BSE आणि नेटिव्ह शेअर म्हणून ओळखल्या जाणार्‍या स्टॉक ब्रोकर असोसिएशनचे संस्थापक देखील होते
  7. मुंबई शेअर बाजाराच्या 125 वर्षांच्या इतिहासात बाजाराने अनेक चढ उत्तर पाहिलेत
  8. BSE मध्ये म्हणजेच मुंबई शेअर बाजारात इक्विटी, करन्सी, कर्ज उपकरणे, डेरिव्हेटिव्ह्ज आणि म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला पारदर्शी पद्धतीने गुंतवणूक आणि व्यवहार करता येऊ शकतात 
  9. BSE च्या माध्यमातून लघु आणि मध्यम उद्योगांना इक्विटीमध्ये ट्रेडिंग करता येतं
  10. BSE च्या माध्यमातून भांडवली बाजारातील सहभागींना जोखीम व्यवस्थापन, क्लिअरिंग, सेटलमेंट, मार्केट डेटा सर्व्हिसेस आणि एज्युकेशन यासह इतर सेवा पुरवल्या जातात
  11. मुंबई शेअर बाजार जगभरात पोहोचलं आहे, तसेच देशभरात BSE च्या माध्यमातून गुंतवणूक केली जाते
  12. ‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज’च्या माध्यमातून सर्व बाजारपेठांमधील भांडवलदारांच्या विकासास चालना देणे, नवनवीन गोष्टी तसेच स्पर्धेला उत्तेजना देण्याचं काम कायम केलं जातं
  13. ISO 9001:2000 मानांकन घेणारं भारतातील पहिलं आणि जगभरातील दुसरं स्टॉक एक्स्चेंज आहे
  14. ऑनलाईन ट्रेडिंग अंतर्गत माहिती आणि सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली मानके प्राप्त करणारं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे भारतातील पहिलं आणि जगातील दुसरे BS – 7799-2-2002 सर्टिफाईड एक्सचेंज आहे

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

mumbai sensex news interesting facts of bombay stock exchange

 

 

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी ‘सकाळ’चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

Web Title:

mumbai sensex news interesting facts of bombay stock exchange

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-sensex-news-interesting-facts-bombay-stock-exchange-400641