मुंबई बातम्या

मुंबई विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ १ फेब्रुवारीला – Marathi News | Convocation ceremony of the Mumbai university on 1st February | Latest mumbai News at Lokmat.com – Lokmat

मुंबई :मुंबई विद्यापीठाचा २०२० चा शैक्षणिक वर्षाचा दीक्षांत समारंभ १ फेब्रुवारी २०२१ रोजी संपन्न होणार आहे. यासाठी प्रथम सत्र २०२० मध्ये विद्यापीठाने घेतलेल्या विविध पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्रावर मराठी (देवनागरी) नाव अचूक यावे म्हणून मराठी (देवनागरी) नावातील संभाव्य चुका टाळण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी व पडताळणीसाठी विद्यार्थ्यांचा तपशील विद्यापीठाच्या संकेतस्थळावर २२ जानेवारी २०२१ पासून ते २७ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याची तारीख निश्चित झाली असली तरी तो प्रत्यक्ष स्वरूपात होणार की ऑनलाईन पद्धतीने इतर शिक्षण संस्थांसारखा व्हर्च्युअल पद्धतीने हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. महाविद्यालये किंवा विद्यापीठ सुरू करण्याच्या कोणत्याही प्रकारच्या सूचना उच्च व तंत्र शिक्षण विभाग किंवा शासनाकडून मिळालेल्या नसल्याने यावर अंतिम निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

सर्व विद्यार्थी व महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळास भेट देऊन पदवी प्रमाणपत्रावर छापून येणारा आपला मराठी (देवनागरी ) नावाचा तपशील अचूक आहे का हे पाहावे, असे आवाहन विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी केले आहे. महाविद्यालय व विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. या लिंक दुरुस्तीसाठी २२ जानेवारीपासून ॲक्टिव्ह होतील. 

करेक्शनची स्वतंत्र लिंक
महाविद्यालयांनी लॉगइन आयडी आणि पासवर्ड देऊन लिंक ओपन करावी, तर विद्यार्थ्यांसाठीही करेक्शनची स्वतंत्र लिंक असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे. महाविद्यालय व विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर स्वतंत्र लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

English summary :
Convocation ceremony of the Mumbai university on 1st February

वाचकहो, ‘लोकमत’ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Convocation ceremony of the Mumbai university on 1st February

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Source: https://m.lokmat.com/mumbai/convocation-ceremony-mumbai-university-1st-february-a653/