मुंबई बातम्या

कोरोना लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी मुंबई महापालिकेचे प्रयत्न – Sakal

मुंबईः  बुधवारी मुंबईत एकूण 10 केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. लसीकरणासाठी 33 जणांचे पथक तैनात करण्यात आले होते. काल 3300 जणांच्या लसीकरणाचे लक्ष ठेवण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात 1728 म्हणजे 52 टक्के लाभार्थींची लसीकरणाचा लाभ घेतला. लसीकरणानंतर केवळ 7 लोकांना किरकोळ त्रास जाणवला असून कुणालाही रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही.

या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी एक आवाहन केलं आहे. कोविन अॅपमधील तांत्रिक बिघाडामुळे मेसेज येत नसतील तरी मेसेजची वाट पाहू नका. नावनोंदणी तपासून लस घ्या, असं काकाणी यांनी म्हटलं आहे. 

पहिल्या टप्प्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना केवळ कोविन अॅप मधील नोंदणी खात्री करून लस मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. कोविन अॅप द्वारे नावनोंदणी झाल्यानंतर ज्या झोनमध्ये लसीकरणासाठी नाव येत असेल त्या झोनमधील कोणत्याही लसीकरण केंद्रावर जाऊन लस मिळणार, असंही ते म्हणालेत.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

लसीकरण केंद्र      एकूण 

  • केईएम रुग्णालय  – 362
  • सायन रुग्णालय  – 135
  • कूपर रुग्णालय  – 149
  • नायर रुग्णालय  – 154 
  • व्ही एन देसाई रुग्णालय  – 57
  • शताब्दी रुग्णालय  – 306 
  • राजावाडी रुग्णालय  – 263
  • जम्बो रुग्णायल   – 133
  • के बी भाभा रुग्णालय – 155
  • जे जे रुग्णालय  – 15

एकूण  – 1728 

अपेक्षित  – 3300

दरम्यान मुंबई एमएमआर रिजनमधील कोरोनाचा आढावा घेऊन शाळा आणि लोकल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेऊ, अशी माहिती काकाणी यांनी यावेळी दिली. सध्या ब्रिटन आणि युके येथून आलेल्या स्ट्रेनबाबत आढावा घेतला जात आहे. ब्रिटनची विमान सेवा सुरू झाली आहे. यामुळे रुग्ण संख्या वाढते का याची माहिती आणि आढावा 15 दिवस घेतला जाणार आहे. हा आढावा घेतल्यावर राज्य सरकारला अहवाल दिला जाईल त्यानंतर शाळा आणि ट्रेन सुरू केली जाईल, अशी माहिती सुरेश काकाणी यांनी दिली आहे. 

हेही वाचा- कोव्हिड काळातील खर्चाचा तपशील देण्यास अधिकाऱ्यांची तारांबळ; हिशोबावर विरोधकांचाही आक्षेप

bombay Municipal Corporation efforts increase percentage of corona vaccination

Source: https://www.esakal.com/mumbai/bombay-municipal-corporation-efforts-increase-percentage-corona-vaccination-400526