मुंबई बातम्या

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कमाल,दरोडा टाकण्याआधीच दरोडेखोरांना केलं गजाआड,80 लाखांचा दरोडा टळला – ABP Majha

मुंबई: हिंदी चित्रपटात आपण नेहमीच पाहतो की गुन्हा घडल्यानंतर उशिराने पोलीस घटनास्थळी पोहचतात. मात्र मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एक अनोखी कामगिरी बजावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. गुन्हे शाखेने चार आरोपींना दरोडा टाकण्याआधीच गजाआड केलं आहे. तब्बल 80 लाख रुपयांचा दरोडा ही टोळी टाकणार होती. या टोळीवर मुंबईच्या विविध पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.

Source: https://marathi.abplive.com/videos/crime/mumbai-police-caught-men-planning-for-robbery-853043