मुंबई बातम्या

मुंबई मेट्रो लाईन-7ला बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्या; रवींद्र वायकर मुख्यमंत्र्यांना भेटले – TV9 Marathi

अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) या मेट्रो लाईन क्रमांक 7 ला (Metro Live Number 7) ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई मेट्रो लाईन क्रमांक 7’ असे नाव देण्यात यावे.

मुंबई : मुंबईत उभारण्यात येणार्‍या मेट्रोच्या जाळ्यापैकी एक अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) या मेट्रो लाईन क्रमांक 7 ला (Metro Live Number 7) ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई मेट्रो लाईन क्रमांक 7’ असे नाव देण्यात यावे, असा प्रस्ताव जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच माजी राज्यमंत्री रविंद्र वायकर (Ravindra Waikar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना दिला आहे. मुख्यमंत्री यांच्यासोबत नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत यावर चर्चाही करण्यात आली (Metro Live Number 7).

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे राजकीय, सामाजिक तसेच धार्मिक क्षेत्रातील योगदान बहूमुल्य आहे. सर्वच स्तरातील जनसामान्यांची त्यांच्या प्रती आदराची भूमिका आहे. व्यंगचित्रकार म्हणून आपल्या कुंचल्यातून समाजातील विविध अनिष्ट प्रथांवर त्यांनी आसुड ओढले. मार्मिक सारख्या यंगचित्र मासिकामधून संयुक्त महाराष्ट्राचा लढा जिवंत ठेवण्याचे महानकार्य शिवसेनाप्रमुखांचे होते.

ठळक बातम्या, बेधडक विश्लेषण, पाहा 8 PM स्पेशल रिपोर्ट, टीव्ही 9 मराठीवर

19 जून 1966 रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना होऊन या पदाच्या प्रमुख पदावर अर्थात शिवसेनाप्रमुख म्हणून बाळासाहेबांचे नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रानेच नव्हे तर अखंड हिंदुस्थानने अत्यंत स्वाभिमानाने स्विकारले. कुठल्याही राज्यातील दळणवळणाची साधने अधिक सक्षम केल्यास त्या राज्याचा सर्वांगिण विकास होण्यास जास्त वेळ लागत नाही. ही त्यांची दुरदृष्टी 1995 मध्ये महाराष्ट्रात शिवशाहीचे सरकार आल्यानंतर जनतेला पहायला मिळाली, ती मुंबई उभारण्यात आलेल्या 55 उड्डाणपुल व मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गाच्या रुपाने.

उज्ज्वल महाराष्ट्र घडविण्यासाठी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या महाविभूतीचे, व्यंगचित्रकाराचे, मराठी मनाच्या अस्मितेचे, हिंदुत्वरक्षकाचे नाव ‘हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई मेट्रो क्रमांक. 7’ देऊन त्यांच्या या कार्याचा यथेच्छ सन्मान करावा, असा प्रस्ताव वायकरांनी मुख्यमंत्र्यांना दिला. या प्रश्‍नी मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री तसेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना देखील प्रस्ताव दिला असून चर्चाही करण्यात आली आहे. एमएमआरडीए आयुक्त आर. ए. राजीव तसेच एमएमआरडीएचे आतिरिक्त आयुक्त डॉ.सोनिया शेठ यांना देखील प्रस्ताव देण्यात आला आहे.

[embedded content]

Metro Live Number 7

संबंधित बातम्या :

पुणे मेट्रोच्या कामाचा वेग, संत तुकारामनगर स्टेशन 96 टक्के पूर्ण, लवकरच…

मुंबई मेट्रो कार शेडबाबत ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय, पुढील पाऊल काय?

Source: https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/minister-ravindra-waikar-give-proposal-to-cm-uddhav-thackeray-to-give-balasaheb-thackerays-name-to-metro-live-number-7-371451.html