मुंबई बातम्या

खेड तालुक्‍यातील कुरकुंडीच्या सुपूत्राला वीरमरण; बॉम्बे सॅपर्सतर्फे लष्करी मानवंदना – Dainik Prabhat

आज शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

राजगुरूनगर – कुरकुंडी (ता. खेड) गावचे सुपूत्र संभाजी ज्ञानेश्‍वर राळे (वय 28) यांना आसाम बॉर्डरवर वीरमरण आले. ही घटना बुधवारी (दि. 6) दुपारी 2 वाजता घडली. यामुळे कुरकुंडी गावावर शोककळा पसरली आहे.

[embedded content]

शहीद जवान संभाजी राळे यांचे पार्थिव आज लोहगाव विमानतळावर आणले. यावेळी बॉम्बे सॅपर्सतर्फे लष्करी मानवंदना देण्यात आली. तर अंत्यसंस्कार त्यांच्या जन्मगावी कुंरकुंडी येथे शासकीय इतमामात होणार आहे.

शहीद जवान संभाजी राळे अविवाहित होते. त्यांच्यामागे आई-वडील, दोन विवाहीत तर एक अविवाहित बहीणी आहेत. एकलुता एक मुलाने देशासाठी बलिदान दिले. मात्र, आईवडीलांच्या आणि बहिणीच्या आक्रोशाने अवघे समाजमन दुखसागरात बुडाले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Source: https://www.dainikprabhat.com/pune-veeramran-to-suputra-of-kurkundi-in-khed-taluka-military-salute-by-bombay-sappers/