मुंबई बातम्या

पालकांसाठी महत्त्वाची बातमी, मुंबईत सुरू आहेत २०६ बेकायदेशीर शाळा – Sakal

मुंबईः  पालकांसाठी महत्वाची बातमी आहे. मुंबई महापालिकेने मुंबईच्या वेगवेगळ्या भागातल्या तब्बल २०६ शाळा बेकायदेशीर असल्याचं घोषित केलं आहे. या खासगी शाळा असून या शाळा  चालवण्यासाठी आवश्यक परवानग्या शाळांनी घेतल्या नसल्याचं पालिकेचं म्हणणं आहे. या शाळेत मुलांना न टाकण्यासाठी पालिकेनं पालकांना आवाहन केलं आहे. 

मुंबई महानगर पालिकेने मुंबईतील तब्बल २०६ शाळा अनधिकृत असल्याचं घोषित केलं आहे. या शाळा खासगी शाळा असून मुंबईतल्या वेगवेगळ्या भागातल्या आहेत. या शाळांच्या, शाळा प्रशासनाने पालिकेकडून आवश्यक त्या मान्यता घेतल्या नसल्यानं त्यांना बेकायदेशीर ठरवण्यात आल्या आहेत. मुंबईतल्या वेगवेगळ्या भागातल्या या शाळा असून यातील बहुतांश शाळा मुंबईच्या उपनगरांत आहेत.

या आहेत अनधिकृत शाळा 

  1. १६२ इंग्रजी माध्यमाच्या शाळा
  2. १६ उर्दु माध्यमाच्या
  3. १५ हिंदी माध्यमाच्या 
  4. आणि १३ मराठी माध्यमाच्या शाळा आहेत.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

  • यातील अधिकतर शाळा या उत्तर आणि पूर्व उपनगरातील आहेत. 
  • एकूण शाळांपैकी पालिकेच्या एम पूर्व विभागात म्हणजेच मानखुर्द आणि गोवंडी परिसरात ६७ अनधिकृत शाळा आहेत.
  • काही शाळा मालाड, मालवणी, घाटकोपर आणि भांडुप परिसरातील देखील आहेत .
  • विशेषतः झोपडपट्टी परिसरात या अनधिकृत शाळा सुरू आहेत.

शाळा चालवण्यासाठी पालिकेकडून मान्यता घेणं अनिवार्य असतं. शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत या मान्यता शाळांना दिल्या जातात. या मान्यता मिळवण्यासाठी राज्य सरकारच्या शिक्षण मंडळाच्या परवानगीनंतर पालिकेकडूनही नियमानं परवानगी घेणं गरजेचं असतं.

हेही वाचा- ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’

पण मुंबईतल्या या शाळांनाही हलगर्जीपणा करत मान्यता न घेताच शाळा सुरू केल्या आहेत. त्यामुळे पालिकेने आता यातील काही अनधिकृत शाळांना १ लाख रुपयापर्यंत दंड थोटावलाय आला आहे. तसेच या शाळांना आता मान्यता मिळवण्यासाठी राज्य सरकारकडून नव्यानं ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावं लागणार आहे. त्यानंतर पालिकेकडे पुन्हा मान्यतेसाठी अर्ज करावा लागेल.

Bombay Municipal Corporation declared 206 schools different parts Mumbai illegal

Source: https://www.esakal.com/mumbai/bombay-municipal-corporation-declared-206-schools-different-parts-mumbai-illegal-393998