मुंबई बातम्या

मुंबई पोलिसांची ही सायकल साधीसुधी नाही ! । Start using battery-operated bicycle for Mumbai Police – Zee २४ तास

मुंबई : सध्या मुंबई पोलिसांत (Mumbai Police) चर्चा आहे ती एका सायकलची. ( Bicycle) ही सायकलच आहे एकदम भारी. मुंबई पोलीस आता आपल्याला या सायकलवर दिसणार आहेत. मात्र पोलिसांची ही सायकल साधीसुधी नसून अत्याधुनिक असणार आहे. ( Bicycle of Mumbai Police) पोलिसांना गस्तीसाठी या सायकल्स (battery-operated bicycle) देण्यात आल्या आहेत. मुंबईतल्या विनोबा भावे पोलीस स्टेशनमध्ये दोन सायकली दाखल झाल्या आहेत. (Start using Battery-operated Bicycle for Mumbai Police)

या सायकलची वैशिष्टे म्हणजे सायकवर वाय-फाय, ब्लूटूथ आणि बॅटरी असून 35 किलोमीटरपर्यंत ही सायकल बॅटरीवर चालणार आहे. त्याचसोबत सायकलमुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्यही सुदृढ होण्यास मदत होणार आहे. मुंबईच्या झोपडपट्टी विभागांमध्ये गस्त घालण्यासाठी या सायकलचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो, असे मत मुंबई पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलं आहे. 

Source: https://zeenews.india.com/marathi/mumbai/start-using-battery-operated-bicycle-for-mumbai-police/546963