मुंबई बातम्या

मुंबई, नवी मुंबईकरांनो तुम्ही का गुदमरताय? ही बातमी तुमच्यासाठी – TV9 Marathi

सकाळी 6 ते 8 या वेळेतील हवेमध्ये पीएम 2.5 या कणांची पातळी जास्त आहे. यामुळे नवी मुंबईकरांना मॉर्निंग वॉकही आता धोकादायक बनला आहे.

मुंबई: राजधानी दिल्लीमध्ये प्रदुषणाची पातळी अत्यंत धोकादायक बनली आहे. त्यानंतर मुंबई आणि नवी मुंबई परिसरात राहणाऱ्यांसाठी वायू प्रदूषणाचा धोका वाढला आहे. मुंबई, बीकेसी, चेंबूर, कुर्ला परिसरात हवीची गुणवत्ता ढासळली आहे. त्याचबरोबर खारघर, तळोजा, पनवेल या भागात राहणाऱ्यांसाठीही एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. पार्टीक्युलेट मॅटर पोप्युलंट अर्थात पीएम 2.5 या कणांची पातळी सर्वाधिक असल्याचं ‘वातावरण’ या संस्थेनं केलेल्या अभ्यासातून समोर आलंय. (Big threat of air pollution in Mumbai, Navi Mumbai area)

‘वातावरण’ ही पर्यावरण क्षेत्रात काम करणारी एक संस्था आहे. या संस्थेनं तळोजा, खारघर आणि पनवेल परिसरात एक महिनाभर अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी हे निरीक्षण नोंदवलं आहे. सकाळी 6 ते 8 या वेळेतील हवेमध्ये पीएम 2.5 या कणांची पातळी जास्त आहे. यामुळे नवी मुंबईकरांना मॉर्निंग वॉकही आता धोकादायक बनला आहे. तसंच पनवेलमधील हवा गेल्या महिनाभर प्रदूषित होती.

पीएम 2.5

पीएम 2.5चे कण सूक्ष्म असल्यामुळे ते सहज दिसत नाहीत. त्यामुळे ते आपल्या फुफ्फुसात प्रवेश करतात आणि आपल्याला श्वसनाचे आजार होण्याचा धोका निर्माण होतो. पीएम 2.5 ची वातावरणातील पातळी वाढल्याला कमी दृश्यमानता आणि धुक्याचेही कारण ठरु शकते अशी माहिती या क्षेत्रात काम करणाऱ्या अभ्यासकांनी दिली आहे.

कोणत्या परिसरात सर्वाधिक धोका?

वातावरण फाऊंडेशनकडून करण्यात आलेल्या अभ्यासात तळोजा MIDC, पनवेल सेक्टर 13, खारघर सेक्टर 36, नावडे, तळोजा परिसराताचा समावेश होता. 13 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर दरम्यान या परिसरातील हवेचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार पीएम 25 कणांची हवेतील पातळी ही भारतीय मानांकनाच्या 6 पट, तर जागतिक आरोग्य संघटना (WHO)च्या मानांकनानुसार 4 पटींनी जास्त असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे हा धोका किती मोठा आहे याचा विचार सर्वसामान्य माणूस करु शकत नाही. वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसाचा संसर्ग, दमा, हृदयविकार, श्वसन संस्थेचे अन्य आजार उद्भवू शकतात. त्यामुळे दिल्ली, मुंबई पाठोपाठ आता नवी मुंबई परिसरातही वायू प्रदूषणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

संबंधित बातम्या:

Indoor Air Pollution | बाहेरच नाही तर घरातही प्रदूषण, ‘या’ कारणांमुळे वाढतं घरातील प्रदूषण

Healthy Food For Typhoid | टायफॉइड तापात  ‘या’ 5 गोष्टींचे सेवन ठरेल लाभदायी

Big threat of air pollution in Mumbai, Navi Mumbai area

Source: https://www.tv9marathi.com/maharashtra/navi-mumbai-big-threat-of-air-pollution-in-mumbai-navi-mumbai-area-349786.html