मुंबई बातम्या

मुंबई-नागपूर-मुंबई फ्लाईट रोज – Lokmat

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एअर इंडियाची मुुंबई-नागपूर-मुंंबई फ्लाईट आता आठवड्यातून तीन दिवसांऐवजी १८ डिसेंबरपासून रोज उड्डाण भरणार आहे. फ्लाईट एआय ६२७ मुंबई-नागपूर सकाळी ६.२० वाजता मुंबई येथून प्रस्थान करेल आणि नागपूरला सकाळी ७.५५ वाजता पोहोचेल तर एआय ६२८ नागपूर-मुंबई सकाळी ९.१० वाजता प्रस्थान करेल. सद्यस्थितीत ही फ्लाईट आठवड्यातून मंगळवारी, गुरुवारी व शनिवारी उड्डाण भरत आहे. एअर इंडियाने नागपूर-दिल्ली-नागपूर फ्लाईट दररोज चालविण्याचा प्रस्ताव मुख्यालयाकडे पाठवला आहे. सद्यस्थितीत ही फ्लाईट आठवड्यातून तीन दिवसच उड्डाण भरत आहे.

Web Title: Mumbai-Nagpur-Mumbai flight daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Source: https://m.lokmat.com/nagpur/mumbai-nagpur-mumbai-flight-daily-a313/