मुंबई बातम्या

मुंबई लोकलमध्ये आता मुलांना नाही करता येणार प्रवास – Times Now Marathi

मुंबई लोकलमध्ये आता मुलांना नाही करता येणार प्रवास, स्थानकांच्या प्रवेशद्वारापाशी आरपीएफ तैनात (फाईल फोटो)&  | & फोटो सौजन्य:&nbspBCCL

थोडं पण कामाचं

  • कोरोनाच्या संकटामुळे भारतीय रेल्वेने घेतला मोठा निर्णय
  • मुंबई लोकलमध्ये मुलांना सोबत घेऊन प्रवास करणाऱ्या महिलांच्या प्रवेशावर बंदी
  • मुलांना थांबवण्यासाठी स्थानकांच्या प्रवेशद्वारावर आरपीएफ तैनात

मुंबई: रेल्वेने (Indian Railway) या गोष्टीचा पुनरुच्चार केला आहे की महिलांना (women) आपल्या लहान मुलांसह (children) मुंबईच्या लोकल ट्रेनने (Mumbai local train) प्रवास करण्यास बंदी (ban on travel) आहे. याआधी बंदी घालूनही मोठ्या संख्येने महिला आपल्या मुलांसोबत प्रवास करत असल्याचे दिसून आल्याने या निर्णयाची घोषणा (decision reiterated) पुन्हा एकदा करण्यात आली आहे. हा नियम मध्य रेल्वे (Central Railway) आणि पश्चिम रेल्वे (Western Railway) अशा दोन्ही मार्गांवर लागू आहे. डीआरएम मुंबई (DRM Mumbai) आणि मुंबई सेंट्रलने (Mumbai Central) या नियमाला मंजूरी दिली आहे. मुलांना स्थानिक रेल्वेत चढण्यापासून थांबवण्यासाठी प्रत्येक प्रवेशद्वारावर (entrance gates) रेल्वे सुरक्षा बलाचे  (Railway Security Force) जवान तैनात (deputation) करण्यात येणार आहेत.

मिशन बिगिन अगेन अंतर्गत महिलांना परवानगी

रेल्वे विभागाने मुंबईत महिलांना मिशन बिगिन अगेन अंतर्गत प्रवास करण्याची परवानगी दिली होती. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वे या दोन्ही लाईन्सवर हे नियम लागू होणार आहेत. मात्र आपल्यासोबत लहान मुलांना घेऊन या महिलांना प्रवास करता येणार नाही. या लाईन्सवरील सर्व स्थानकांवर तैनात करण्यात आलेले रेल्वे सुरक्षा दलाचे जवान आपल्यासोबत लहान मुलांना घेऊन येणाऱ्या महिलांना स्थानकांत प्रवेश करण्यापासून रोखून परत पाठवण्याचे काम करणार आहेत.

काय आहे रेल्वे प्रशासनाचा याबाबतचा नवा आदेश?

या आदेशात म्हटले आहे की रेल्वे बोर्डाने फक्त मुंबई महानगर क्षेत्रात ठराविक वेळेत महिला प्रवाशांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. पण यातील काही महिला आपल्या मुलांसोबत प्रवास करत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे हा आदेश पुन्हा एकदा देण्यात आला आहे की ही परवानगी फक्त महिलांसाठी आहे, लहान मुलांसाठी नाही.

बातमीची भावकी

सर्व महिलांना दिली होती लोकल प्रवासाची परवानगी

महाराष्ट्र सरकारने मिशन बिगिन अगेनच्या अंतर्गत ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सरसकट सर्व महिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली होती. त्याआधी फक्त अत्यावश्यक सेवा आणि सरकारी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिलांनाच ही परवानगी होती. मात्र आता असे काही निर्बंध नाहीत. सर्वच महिला सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत आणि संध्याकाळी ७पासून ते मध्यरात्रीपर्यंत लोकलने प्रवास करू शकतात. मात्र या नव्या आदेशानुसार त्यांना लहान मुलांना सोबत घेता येणार नाही.

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/children-won-t-be-allowed-to-travel-by-mumbai-local-rpf-deputed-in-the-entry-gates/323569