मुंबई बातम्या

मुंबई महापालिकेची ‘सॅप’ प्रणाली गुरुवारपर्यंत बंद – मुंबई लाइव्ह

मुंबई महानगरपालिकेची सॅप प्रणाली अद्ययावत करण्यात येणार आहे. या कामासाठी सॅप प्रणाली २६ नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे पालिकेकडून नागरी सुविधा केंद्रांमधील सेवा, निविदा भरणे किंवा कार्यादेश देणे, अधिदान करणे आदी कामं करता येणार नाहीत. 

मुंबईकरांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी मुंबई महापालिकेकडून उपयोगात येणाऱ्या ‘सॅप’ संगणकीय प्रणालीचे अद्ययावतीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आलं आहे. १३ नोव्हेंबर पासून हे काम सुरू असून ते २६ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.

सॅप प्रणालीमध्ये नवीन वैशिष्ट्ये समाविष्ट करुन ती अद्ययावत करण्यात येणार आहे. यामुळे सर्वोत्तम सेवा देण्यासह सॅप प्रणाली अधिक सुरक्षित होणार आहे. ही अद्ययावत, वैशिष्ट्यपूर्ण सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी, सध्या कार्यान्वित असलेल्या सॅप प्रणालीचे सर्व्हर्स बंद करावे करून त्याचे अद्ययावतीकरण करण्यात येत आहे.


हेही वाचा –

यंदा महापरिनिर्वाणदिनी चैत्यभूमीवरून थेट प्रक्षेपण, अनुयायांना मज्जाव

महापालिका कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी ‘फेस रिडर’ यंत्रणा


Source: https://www.mumbailive.com/mr/civic/mumbai-municipal-corporation-sap-system-closed-till-26-november-58262