मुंबई बातम्या

मुंबई कॉंग्रेसमध्ये बदलांचे वारे, प्रभारींची केवळ अमरजित सिंह आणि भाई जगतापांशीच ‘चाय पे चर्चा’; अनेकांच्या भुवया उंचावल्यात – Sakal

मुंबई, ता. 17: मुंबई कॉंग्रेसमध्ये बदलांचे वारे वाहत असतानाच आज महाराष्ट्र प्रभारी च. के. पाटील यांनी सह्याद्री शासकीय अथीतीगृहावर मुंबई कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अमरजित सिंह मनहास आणि विधानपरीषद सदस्य भाई जगताप यांची भेट घेतली. अध्यक्षपदाच्या स्पर्धेत असलेल्यांपैकी फक्त दोघांसोबतच प्रभारी पाटील यांनी चहाच्या वेळी चर्चा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मुंबई कॉंग्रेसचे प्रभारी अध्यक्ष, कनाथ गायकवाड यांच्या जागी कायमस्वरुपी अध्यक्ष नियुक्त करण्यासाठी कॉग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यांपासून जोरदार बैठका सुरु आहे.पाटील यांनी यापुर्वीही कॉंग्रेसच्या मुंबईतील नेत्यांच्या बैठका घेतल्या होत्या. त्यानंतर आज माजी विधासना आणि विधानपरीषदेच्या आमदारांच्या बैठक घेऊन नेतृत्व बदलाबाबत त्यांची भुमिका जाणुन घेतली. यावेळी अलका देसाई, विरेंद्र बक्षी, युसूफ अब्राहमी, बलदेव खोसा चरणसिंह सप्रा यांची भुमिका जाणून घेतली. त्याचबरोबर मुंबई महापालिकेचे उपाध्यक्ष रवी राजा, मुंबई महिला कॉंग्रेसच्या उपाध्यक्षा अजंता यादव, एन एस यु आयचे मुंबई अध्यक्ष बिपीन सिंह, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष गणेश यादव यांचीही भेट घेतली.

महत्त्वाची बातमी : प्रेयसीचा गळा चिरून; स्वतःच्याच तोंडात फोडला सुतळी बॉम्ब; मालाडमधील धक्कादायक घटना

मुंबई अध्यक्ष होण्याच्या स्पर्धेत मनहास ,भाई जगताप यांच्या बरोबरच माजी मंत्री सुरेश शेट्टी आणि नसीम खान यांचाही समावेश आहे.मात्र,आज पाटील यांनी फक्त मनहास आणि जगताप यांची सकाळी भेट घेतल्याने त्या दोघांची नावे आघाडीवर आहे. मनहास यांनी विद्यार्थ्यी दशेपासून कॉंग्रेसच्या विविध पदांवर काम केले आहे. 12 वर्ष ते मुंबई कॉंग्रेसचे काेषाध्यक्ष होते तर चार वर्ष ते मुंबई म्हाडाचे अध्यक्ष होते.त्यांच्या काळातच म्हाडाच्या घरांच्या लॉटरीचे स्वरुप बदलून त्या अधिक पारदर्शक करण्यात मनहास यांचे योगदान होते. तर, भाई जगताप हे कामगार संघटनेच्या क्षेत्रातून आलेले असून 2004 मध्ये ते पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले होते. त्यानंतर 2009 मध्ये त्यांचा पराभव झाला. मात्र,2010 आणि 2016 असे सलग दोन वेळा त्यांना पक्षांकडून विधानपरीषदेवर संधी मिळाली आहे.

( संपादन – सुमित बागुल )

Maharashtra congress in charge patil met amrjit singh and bhai jagatap at sahyadri

Source: https://www.esakal.com/mumbai/maharashtra-congress-charge-patil-met-amrjit-singh-and-bhai-jagatap-sahyadri-373918