मुंबई बातम्या

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी मुंबई पोलिसांच्या ताब्यात – Sakal

बंगळूर : येथील शहर न्यायालयाने अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याला 10 दिवसांसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात सोपविले. 2015 च्या महाराष्ट्र संघटित गुन्हे अधिनियम (मोका) प्रकरणात रवी पुजारी याला न्यायालयात हजर होणे आवश्‍यक होते. या याचिकेच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

बांधकाम व्यावसायिक राजू पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली रवी पुजारीच्या साथीदारांना अटक केली आहे. मुंबई गुन्हा शाखेच्या दरोडा नियंत्रण पथकाच्या एका पोलिस अधिकाऱ्याने रविवारी पुजारी याला त्याच्या कागदपत्रांसह मोका प्रकरणातील विशेष न्यायाधीशांनी लिहिलेल्या पत्रासह आरोपींला ताब्यात द्यावे, असे आवाहन केले होते. परंतु, या याचिकेवर आक्षेप घेणाऱ्या वकिलाने, प्रत्यार्पणाच्या आदेशाचा (ईओ) संदर्भ नसल्याने ही याचिका वैध असू नये. कर्नाटक उच्च न्यायालयासमोर रिट अर्ज बाकी आहे.

हेही वाचा- पोलिस ऑन ड्यूटी २४ तास! सण, उत्सव ठाण्यातच

शिवाय कर्नाटकातील प्रकरणांचा निकाल लागेपर्यंत आरोपीला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देणे शक्‍य नाही, असा दावा केला. कोरोनाच्या परिस्थितीत आरोपी मुंबईत परत गेला, तर त्याला संसर्ग होण्याची शक्‍यता आहे, असे सांगून त्यांनी अशा प्रकारच्या घटनेत आरोपींना ठेवता येणार नाही. मुंबईत पुजारीच्या जिवाला धोका असल्याचा युक्तीवादही त्यांनी केला. हा युक्तिवाद ऐकून 61 व्या शहर अतिरिक्त दिवाणी व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. माणिक्‍य यांनी, मुंबई पोलिसांना पुजारीला 12 डिसेंबरपूर्वी ताब्यात घ्यावे. तसेच मुंबईला नेल्यानंतर आवश्‍यक ती सुरक्षा उपाययोजना करण्याचे आदेश दिले.  

संपादन- अर्चना बनगे

Source: https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/kolhapur/underworld-don-ravi-pujari-custody-mumbai-police-373607