मुंबई बातम्या

दिवाळीत मुंबईत २ जैन मंदिरे उघडणार – Times Now Marathi

दिवाळीत मुंबईत २ जैन मंदिरे उघडणार& 

थोडं पण कामाचं

  • दिवाळीत मुंबईत २ जैन मंदिरे उघडणार
  • मुंबईतील दोन जैन मंदिरांना न्यायालयाची सशर्त परवानगी
  • दादरचे एक आणि भायखळ्याचे एक जैन मंदिर उघडले जाईल

मुंबईः दिवाळीच्या कालावधीमध्ये मुंबईत दोन जैन मंदिरे उघडणार आहेत. न्यायालयाच्या अटींचे पालन करुन तसेच कोविड प्रोटकॉल पाळून या मंदिरात मर्यादीत नागरिकांना प्रवेश करता येणार आहे. जैन धर्मासाठी दिवाळीचे पाच दिवस अतिशय शुभ समजले जातात. या पाच दिवसांसाठी दादरचे एक आणि भायखळ्याचे एक जैन मंदिर उघडले जाईल. (Bombay HC allows two Jain temples to reopen with conditions of limited entry during Diwali)

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार १३ ते १७ नोव्हेंबर या कालावधीत दररोज सकाळी सहा ते दुपारी एक आणि संध्याकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत दादरचे एक आणि भायखळ्याचे एक जैन मंदिर मर्यादीत भाविकांसाठी खुले असेल. कोविड प्रोटकॉल पाळून भाविकांना मंदिरात दर्शनासाठी येणे-जाणे शक्य होणार आहे.

दिवाळीच्या शुभ काळाचे कारण पुढे करुन याचिका करणाऱ्यांनी मुंबईतील १०२ जैन मंदिरे भाविकांसाठी खुली करण्याची मागणी केली होती. ही मागणी न्यायालयाने फेटाळली मात्र मुंबईतील दोन जैन मंदिरांसाठी सशर्त परवानगी दिली. 

महाराष्ट्रात ९२ हजार ४६१ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी १६ हजार ३७३ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण मुंबई मनपाच्या हद्दीत आहेत. कोरोना संकट संपलेले नाही. अशा परिस्थितीत सरकारी आदेशामुळे मंदिरे खुली करण्यास परवानगी दिली जाऊ शकत नाही. मात्र विशिष्ट सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कारणांची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने दोन जैन मंदिरांना भाविकांसाठी खुले करण्याकरिता सशर्त परवानगी दिली.

दिवाळी हा सण सर्व जाती धर्माचे नागरिक उत्साहाने साजरे करतात. मोठ्या संख्येने भाविक दिवाळीच्या दिवसांमध्ये मंदिरांमध्ये दर्शनाला जातात. पण महाराष्ट्रात कोणतेही धार्मिकस्थळ उघडण्याची परवानगी राज्य सरकारने दिलेली नाही. अशा परिस्थितीत अपवाद करू नये, अशी विनंती राज्य सरकारच्यावतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी केली. 

महाराष्ट्रात कोरोना संकट आहे, अशा परिस्थितीत हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट यांना निव्वळ व्यावसायिक कारणांमुळे परवानगी दिली आहे; अशी भूमिका राज्य सरकारच्यावतीने कुंभकोणी यांनी मांडली. यावर बोलताना याचिका करणाऱ्यांनी हॉटेल, बार यांना ५० टक्के क्षमतेने व्यवसाय करण्याची परवानगी आहे प्रत्यक्षात अनेक ठिकाणी १०० टक्के क्षमतेने हॉटेल, बार सुरू असल्याचे सांगितले. यावर स्पष्टीकरण देण्याचे टाळून मंदिर आणि बार यांची तुलना करणाऱ्या विधानावर राज्य सरकारच्यावतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी आश्चर्य व्यक्त केले.

बातमीची भावकी

मुख्यमंत्री म्हणतात, दिवाळीनंतर धार्मिकस्थळे नव्या नियमांनी उघडू

याआधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Maharashtra CM) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिवाळीनंतर मंदिरे (सर्व धार्मिकस्थळे) पुन्हा उघडण्याचे संकेत दिले. दिवाळी झाल्यानंतर (post Diwali) नवीन नियमावली जाहीर (new guidelines) करून त्याअंतर्गत मंदिरे (सर्व धार्मिकस्थळे) उघडण्यात (reopening temples) येतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मंदिरे (सर्व धार्मिकस्थळे) पुन्हा उघडताना पूर्ण काळजी घेतली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासन देणाऱ्या वक्तव्यावर वारकरी संप्रदायाच्या बंडातात्या कराडकर यांनी पत्रक काढून नाराजी व्यक्त केली. देशभर मंदिरे सुरू झाली तरी महाराष्ट्रातील देव बंदीवासात असल्याचा मुद्दा या पत्रकात नमूद आहे.

Source: https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/mumbai-news/article/bombay-hc-allows-two-jain-temples-to-reopen/321169