मुंबई बातम्या

मुंबई पालिका देवनार डंम्पिंग ग्राऊंडमध्ये वीज निर्मिती प्रकल्प उभारणार – Sakal

मुंबई: मुंबई महानगर पालिका देवनार डंम्पिंगमध्ये 1 हजार कोटी रुपये खर्च करुन वीज निर्मिती प्रकल्प उभारणार आहे. जानेवारी महिन्यात शिवसेनेने या प्रस्तावाला विरोध केला होता. मात्र, गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

देवनार डंम्पिंग येथे रोज 600 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करुन वीज निर्मीती करण्यात येणार आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी पालिका 648 कोटी रुपये खर्च करणार आहे. पुढील 15 वर्षाच्या देखभालीसाठीसाठी 400 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. असा 1 हजार 56 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. यासाठी चेन्नई येथील एम.एस डब्ल्यू प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात पालिका प्रशासनाने हा प्रस्ताव मांडला होता. मात्र तेव्हा प्रशासानाने दुसऱ्या क्रमाकांच्या कंत्राटदाराला हे काम देण्याची मागणी हा प्रस्ताव नाकारला होता. आता तोच प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

यापूर्वी दुसऱ्या क्रमांकाच्या कंत्राटदाराला शिवसेनेने घाट घातला होता. तेव्हा भाजपच्या विरोधामुळे हा प्रस्ताव प्रशासनाने रद्द केला होता,असा दावा भाजपचे स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी केला. आमच्या शंकाना प्रशासनाकडून जे उत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे समाधान होऊन हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

अधिक वाचाः दिवाळीनंतर महाविद्यालयांची दारे उघडणार ? UGC च्या महत्त्वपूर्ण सूचना

चर्चा न करता प्रस्ताव मंजूर

भाजपला या विषयावर बोलायचे होते. मात्र, संधीच देण्यात आली नाही. अशी नाराजी शिरसाट यांनी व्यक्त केली. समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनीही या प्रस्तावावर बोलण्याची संधी न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. हा प्रस्ताव फक्त कचऱ्या पासून वीज निर्मीतीचा नाही तर त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणांमाबाबत विचारा करायची होती. संधी मिळू शकली नाही असे शेख यांनी सांगितले.

अधिक वाचाः कोरोना लढाईतील पुढचं पाऊल, कोविशील्डची चाचणी आता ज्येष्ठ नागरिकांवर

रोज 25 ते 30 मेगावॅट वीज

देवनार येथे रोज 3 हजार मेट्रिक टन कचऱ्यातून 25 -30 मेगावॅट वीज निर्मिती करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. पहिल्या टप्प्यात 600 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. मुंबईत सध्या रोज साडे सहा हजार मेट्रिक टन कचरा निर्माण होत आहे. त्यातील साडे पाच हजार मेट्रिक टन कचऱ्यावर कांजूर येथे प्रक्रिया केली जाते. उर्वरीत कचरा देवनार डंम्पिंगवर आणला जातो.

———————————-

(संपादनः पूजा विचारे)

Mumbai Municipal Corporation will set up power generation project at Deonar dumping ground

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-municipal-corporation-will-set-power-generation-project-deonar-dumping-ground-368882