मुंबई बातम्या

मुंबई पोलीस हे जगातील सर्वोत्तम पोलीस, उच्च न्यायालयाकडून स्तुती । Mumbai Police is the best police in the world – Mumbai High Court – Zee २४ तास

मुंबई : मुंबई पोलीस हे जगातले सर्वोत्तम पोलीस खाते असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. शुक्रवारी एका सुनावणीदरम्यान कोरोनाच्या काळात अगदी प्रतिकूल परिस्थितीत पोलिसांनी आपले कर्तव्य चोख बजावल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. मुंबई पोलिसांना जगात सर्वोत्कृष्ट मानले जाते आणि त्याची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी केली जाते, असही न्यायालयाने नमूद केले. नवी मुंबईतील रहिवासी सुनैना होले यांच्यावर दाखल झालेल्या तीन एफआयआर रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. त्यावरील सुनावणीत न्यायालयाने मुंबई पोलिसांची स्तुती केली. 

लॉकडाऊन असताना देखील नागरिकांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले. कोरोना  सारख्या साथीच्या आजारात देखील पोलीस अधिकारी – कर्मचारी त्यांच्यावर खूप ताण असताना देखील १२ तासांची सेवा बजावत आहेत, या सर्व प्रकारच्या परिस्थितींमध्ये देखीलमुंबई पोलिसांना जगातील सर्वोत्कृष्ट मानले जाते आणि त्याची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी केली जाते. नवी मुंबईतील रहिवासी, सुनैना होले यांनी समाज माध्यमातून टीका केली होती. टीका केल्याने समाजातील गटांमधील तेढ निर्माण होईल  या विरोधात दाखल झालेल्या तीन एफआयआर रद्द करण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हे वक्तव्य केले. 

गुरुवारी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठानेही सांगितले की, मुंबई पोलिसांना जगातील सर्वोत्तम मानले जाते. त्यांची कामगिरी उत्तम असून मुंबई  पोलिसांना देखील जनतेने सहकार्य केले पाहिजे. गुरुवारी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठानेही सांगितले की, मुंबई पोलिसांना जगातील सर्वोत्तम मानले जाते. 

Source: https://zeenews.india.com/marathi/mumbai/mumbai-police-is-the-best-police-in-the-world-mumbai-high-court/539900