मुंबई बातम्या

कंगनाच्या प्रकरणात मुंबई पालिकेचा वकिलावर तब्बल ८२ लाख खर्च – Sakal

मुंबई: अभिनेत्री कंगणा राणावतने महापालिके विरोधात दाखल केलेल्या खटल्यातील वकिलाच्या शुल्का पोटी प्रशासनाने आता पर्यंत 82 लाख 50 हजार रुपये खर्च केले आहे.

कंगणाच्या वांद्रे येथील कार्यालयातील बेकायदा बांधकामावर पालिकेने एक दिवसांची नोटीस देऊन कारवाई केली होती. ही कारवाई सुरु असतानाच कंगणाने न्यायालयात आव्हान दिले होते. हा खटला सध्या उच्च न्यायालयात सुरु आहे.  या खटल्यात बाजू मांडण्यासाठी महापालिकेने ज्येष्ठ विधीज्ञ अस्पी चिनॉय यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या शुल्कापोटी पालिकेने आता पर्यंत 82 लाख 50 लाख रुपये खर्च केले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते शरद यादव यांनी माहितीच्या अधिकारा अंतर्गत ही माहिती मिळवली आहे.

अधिक वाचा-  कोरोना लसीच्या चाचण्या कुठवर? केईएम आणि नायरमध्ये आतापर्यंत 20 जणांना कोव्हिशील्डचा दुसरा डोस

कंगनाप्रकरणी पालिकेने न्यायालयात नेमलेल्या वकिलाला आतापर्यंत किती मानधन देण्यात आले, याची माहिती शरद यादव या माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी पालिकेकडे मागितली होती. पालिकेने दिलेल्या उत्तरात २२ सप्टेंबरपर्यंत २२ लाख ५० हजार;तर ७ ऑक्टोबरपर्यंत ६० लाख रुपये, असे एकूण ८२ लाख ५० हजार दिले असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

अधिक वाचा-  मुंबईतील मलेरियाची रुग्णसंख्या कोरोना संख्येएवढी झाली आहे का?

पालिकेने 8 सप्टेंबरला कार्यालयातील बेकायदा बांधकामाबाबत नोटीस बजावली होती. 24 तासात सर्व संबंधित कागदपत्र सादर करण्याचे निर्देश या नोटीस मध्ये होते. मात्र, कंगणाकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने दुसऱ्या दिवशी पालिकेने कारवाई सुरु केली. ही कारवाई सुरु असताना कंगणाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

—————————-

(संपादनः पूजा विचारे)

Mumbai Municipal Corporation has spent Rs 82 lakh on a lawyer in Kangana case

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-municipal-corporation-has-spent-rs-82-lakh-lawyer-kangana-case-364893