मुंबई बातम्या

मुंबई – मडगाव दरम्यान विशेष ट्रेन सुरू – मुंबई लाइव्ह

कोकण रेल्वे मुंबई आणि मडगावदरम्यान उत्सव काळात चाकरमान्यासाठी  विशेष ट्रेन चालवणार आहे. २४ ते ३१ ऑक्टोबरपर्यंत या कालावधीत ही विशेष ट्रेन धावणार आहे. 

ही विशेष ट्रेन  मडगावहून दररोज ४.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुसऱ्या दिवशी ५ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. ही उत्सव ट्रेन २५ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज ११ वाजून ५ मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२ वाजून १० मिनिटांनी मडगावला पोहोचेल. केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, पेडणे, थिवि आणि करमाळी या ठिकाणी ही रेल्वे थांबेल. बुकिंग विशेष शुल्कासह विशेष संगणकीय आरक्षण केंद्रांवर आणि संकेतस्थळावर करता येणार आहे.


हेही वाचा –

कोविशिल्डच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात

मुंबईत कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी ‘इतक्या’ दिवसांवर


Source: https://www.mumbailive.com/mr/transport/konkan-railway-run-special-train-between-mumbai-and-madgaon-57112