मुंबई बातम्या

मुंबई ते नवी मुंबई वॉटर टॅक्सी; नोव्हेंबरमध्ये सुरु होण्याची शक्यता – Sakal

मुंबई ः मुंबईहून नवी मुंबईला जाण्यासाठी वेगवान स्पीडबोटीचा प्रवास नोव्हेंबरपासून सुरु होण्याची शक्यता आहे. सर्व परवानग्या मिळाल्या तर मुंबई पोर्ट ट्रस्ट तर्फे ही वॉटर टॅक्सी सेवा सुरु केली जाईल. 

मुंबईकरांसाठी खुशखबर! बेस्ट बसेस पुर्ण क्षमतेने चालवण्यास राज्य सरकारने परवानगी

प्रिन्सेस डॉक येथील डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल वरून ही वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्याचा प्रस्ताव आहे. तेथून बेलापूर, वाशी, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट तसेच मांडवा येथपर्यंत ही सेवा सुरु होईल. सध्या मुंबईहून या ठिकाणी जाण्यासाठी किमान दोन ते तीन तास लागतात, मात्र या वॉटर टॅक्सीने हे अंतर जेमतेम अर्ध्या तासात कापता येईल. 

एरवी वाहतूक कोंडी, प्रदूषण, रणरणते उन, बस वा रेल्वेमधील गर्दी, रस्त्यांवरील खड्डे यामुळे एवढ्या लांब जाणे फारच त्रासाचे ठरते. त्यामुळे समुद्रमार्गे ही सेवा सुरु करावी, अशी मागणी बराच काळ होत होती. मात्र अनेक अडथळ्यांमुळे ही सेवा सुरु होणे लांबत गेले. जलमार्गाचा प्रवास वेगवान व अत्यंत आरामदायी होईल, असा पोर्ट ट्रस्ट चा दावा आहे. प्रथम ही सेवा वरील मार्गांवर चालविली जाईल, नंतर ती अन्य मार्गांवर सुरु करण्याचा विचार आहे

अनुसूचित जमातीतील सहायक प्राध्यापक पदभरतीत घोटाळा? SC/ST आयोगाने मागविला अहवाल

ही सेवा सुरु करण्यासाठी सहा इच्छुकांकडून प्रस्ताव आले आहेत. सर्व बाबी तपासून त्यातील एक किंवा दोघांना या मार्गांवर सेवा देण्यास सांगितले जाईल. या सेवेचे भाडेही बोट चालवणारी कंपनी ठरवेल. नोव्हेंबरमधेच ही सेवा सुरु करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे पोर्टट्रस्ट च्या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. मुंबई अलिबाग दरम्यान चालणारी रोरो सेवा 20 ऑगस्टपासून सुरु झाल्यावर आतापर्यंत तिच्यातून आतापर्यंत बाराशे मोटारींनी पैलतीर गाठला आहे. त्यावरून अशा जलमार्गाचे महत्व लक्षात येते अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Mumbai to Navi Mumbai water taxi Likely to start in November

————————————————

( संपादन – तुषार सोनवणे)

Source: https://www.esakal.com/mumbai/mumbai-navi-mumbai-water-taxi-likely-start-november-363260