मुंबई बातम्या

मुंबई १६२० नवीन रुग्ण – Loksatta

गेल्या कित्येक दिवसांनंतर एका दिवसातील रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सोमवारी १६२० नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर आशादायक बाब म्हणजे १९६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ३६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत दररोज दोन हजारांच्या आसपास रुग्णांची नोंद दररोज होत आहे, मात्र सोमवारी कमी संख्येने रुग्णांची नोंद झाली. १६२० नवीन रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बाधितांचा आकडा २,३१,०७० वर गेला आहे. तर आतापर्यंत १,९५,७७३ म्हणजेच ८४ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या २२,६९३ रुग्ण उपचाराधीन आहेत.

सोमवारी ३६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मृतांमध्ये ३० रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. त्यात २८ पुरुष व ८ महिला होत्या. २८ रुग्णांचे वय ६० वर्षांवर होते. मुंबईतील मृतांची एकूण संख्या ९४६६ वर गेली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

ताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.

First Published on October 13, 2020 12:22 am

Web Title: mumbai 1620 new patients abn 97

Source: https://www.loksatta.com/mumbai-news/mumbai-1620-new-patients-abn-97-2300135/