मुंबई बातम्या

Rhea Chakraborty Bail: रियाला जामीन मिळताच तिचे वकील सतीश मानेशिंदे म्हणाले… – Maharashtra Times

मुंबई: बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला जामीन मंजूर झाल्याबद्दल तिचे वकील अॅड. सतीश मानेशिंदे (Satish Maneshinde) यांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘सत्यमेव जयते… अखेर सत्याचा आणि न्यायाचा विजय झाला आहे,’ अशी प्रतिक्रिया मानेशिंदे यांनी दिली आहे.

मुंबई उच्च न्यायालयानं आज रिया चक्रवर्ती हिला सशर्त जामीन मंजूर केला. पासपोर्ट पोलिसांकडे जमा करून सहा महिने विशिष्ट तारखांना पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याची अट न्यायालयानं रियाला घातली आहे. हमीदारांची त्वरित व्यवस्था होऊ शकणार नसल्याने सध्या रोखीच्या जामिनावर सुटका होण्याची मुभा द्यावी, अशी विनंती मानेशिंदे यांनी न्यायालयाला केली होती. ती मंजूर करत रोख एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यासह जामीन मंजूर करण्यात आला.

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण: रिया चक्रवर्तीला जामीन, पण भाऊ अडकला

मानेशिंदे यांनी न्यायालयाच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ‘न्यायालयाच्या या निर्णयाने आम्ही खूप आनंदित आहोत. रियाची अटक आणि कोठडी ही अन्यायकारकच होती. न्यायालयाने वस्तुस्थिती आणि कायदेशीर मुद्दे लक्षात घेऊनच रियाला जामीन मंजूर केला आहे. सीबीआय, ईडी आणि एनसीबी अशा तीन-तीन तपास यंत्रणांनी रियाला लक्ष्य केले असून ते आता थांबायला हवे,’ असं ते म्हणाले. ‘आम्ही नेहमी सत्याच्याच बाजूने राहणार आहोत,’ असंही ते म्हणाले.

वाचा: ड्रग्ज चॅटनंतर सारापासून दूर राहिला होता सैफ?, आलं स्पष्टीकरण

Source: https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/advocate-satish-maneshinde-reaction-after-bombay-hc-grants-bail-to-rhea-chakraborty/articleshow/78529175.cms