मुंबई बातम्या

29 दिवसांनंतर रिया चक्रवर्ती तुरुंगातून येणार बाहेर, या अटींवर जामीन मंजूर – News18 लोकमत

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput Death Case) समोर आलेल्या ड्रग कनेक्शनमध्ये आज सर्वात मोठी घडामोड घडली आहे. याप्रकरणी तुरुंगात असलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला जवळपास महिनाभराने जामिन मंजूर करण्यात आला आहे.

  • Share this:

मुंबई, 07 ऑक्टोबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात (Sushant Singh Rajput Death Case) समोर आलेल्या ड्रग कनेक्शनमध्ये आज सर्वात मोठी घडामोड घडली आहे. याप्रकरणी तुरुंगात असलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) जवळपास महिनाभराने जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. याप्रकरणी अटकेत असणाऱ्या सॅम्युअल मिरांडा आणि दिपेश सावंत यांचा जामीन अर्ज देखील खंडपीठाने मंजूर केला आहे. तर शौविकबरोबर अब्दुल बसीथ परिहारचा जामीन अर्थ फेटाळण्यात आला आहे. NDPS कायद्याच्या विविध तरतुदींनुसार त्यांच्याविरोधात एनसीबीने खटला दाखल केला होता.

मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्री रिया चक्रवर्तीला मोठा दिलासा दिला आहे. 29 दिवसांनी उच्च न्यायालयाने अभिनेत्रीचा जामीन मंजूर केला आहे. मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश एस. व्ही. कोतवाल यांच्या खंडपीठाने या याचिकेवर सुनावणी केली. रिया चक्रवर्तीला 8 सप्टेंबर रोजी जुन्या WhatsApp चॅटच्या आधारावर अटक करण्यात आली होती. याप्रकरणात अटक करण्यात आलेल्या 5 पैकी 3 आरोपींना जामीन मंजूर झाला आहे.

जामीन मंजूर करताना रियाला काही अटींचे पालन करणे आवश्यक आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीला 1 लाख रुपयाचा जामीन बाँड भरावा लागणार आहे. तसंच तिला देशाबाहेर जाता येऊ नये याकरता तिला तपास यंत्रणेकडे तिचा पासपोर्ट देखील जमा करावा लागणार आहे. रियाला मुंबईबाहेर जाण्याची परवानगी नाही आहे त्याचप्रमाणे जेव्हा एनसीबीकडून तिला चौकशीसाठी बोलावले जाईल त्यावेळी तिला हजर रहावे लागणार आहे.

Published by:
Manoj Khandekar

First published:
October 7, 2020, 11:29 AM IST

Source: https://lokmat.news18.com/mumbai/bombay-high-court-grants-bail-to-rhea-chakraborty-brother-showik-chakraborty-bail-plea-rejected-mhjb-485492.html