मुंबई बातम्या

1 ऑक्टोबरपासून मुंबई प्रवेश महागणार, मुंबईत प्रवेश करणाऱ्यांवर ‘टोल’धाड – Sakal

मुंबई : मुंबईत प्रवेश घेण्यासाठी आता वाहन चालकांना अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागणार आहे. मुंबईत खासगी वाहनाने ये जा करणाऱ्यांना आता १ ऑक्टोबर पासून वाढीव टोल भरावा लागणार आहे. मुंबईच्या मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि लालबहादूर शास्त्री मार्ग या पाचही प्रवेशद्वारांवर एमईपी कंपनीचे टोलनाके असून, राज्य रस्ते विकास महामंडळासोबत झालेल्या करारानुसार टोलच्या दरात दर तीन वर्षांनी होणाऱ्या नियमित वाढ होणार आहे. 

टोलचे नवे दर

  • छोटी वाहने – 40 रुपये
  • मध्यम अवजड वाहने – 65रुपये
  • ट्रक आणि बसेस – 130 रुपये
  • अवजड वाहने – 160 रुपये

महानगर प्रदेशातील 55 उड्डाणपुलांच्या उभारणीचा खर्च 2002 ते 2027 या 25 वर्षांत वसुलीसाठी हे टोलनाके  उभारण्यात आले आहे. त्यानुसार आता 1 ऑक्टोबर पासून टोल दरवाढ होणार आहे.

महत्त्वाची बातमी : राऊतांचा रोखठोक सवाल; मारुती कांबळेप्रमाणे आता सुशांत सिंह प्रकरणाचं काय झालं?

कार, जीपसारख्या हलक्या वाहनांच्या एकेरी प्रवास दरात पाच रुपयांची वाढ होऊन आता टोलचा दर 40 रुपये होईल. मिनी बस, 12 ते 20 प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या मध्यम वाहनांच्या टोल दरात 10 रुपयांनी वाढ होऊन तो 65 रुपये होईल. ट्रक आणि बसच्या टोल दरात 105 वरून 130 अशी 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

अवजड वाहनांचा टोल 135 रुपयांवरून 160 रुपये असा वाढविण्यात आला आहे. हलक्या वाहनांच्या पासिक पासातही वाढ झाली आहे. पाचही नाक्यांसाठी असलेला मासिक पास आता 1400 रुपयांऐवजी 1500 रुपये होणार आहे.

( संपादन – सुमित बागुल ) 

toll to enter mumbai and exit mumbai to increase from 1st october

 

Source: https://www.esakal.com/mumbai/toll-enter-mumbai-and-exit-mumbai-increase-1st-october-350870